मराठी बातम्या /बातम्या /मनी /

New Rule: आजपासून बदलणारे 'हे' 10 नियम तपासा, थेट तुमच्या खर्चावर होणार परिणाम

New Rule: आजपासून बदलणारे 'हे' 10 नियम तपासा, थेट तुमच्या खर्चावर होणार परिणाम

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (Post Payment Bank) आधारवर आधारित असलेल्या पेमेंट सेवेसाठी (AePS) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा नियम 15 जूनपासून प्रत्यक्ष लागू केला जाणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (Post Payment Bank) आधारवर आधारित असलेल्या पेमेंट सेवेसाठी (AePS) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा नियम 15 जूनपासून प्रत्यक्ष लागू केला जाणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (Post Payment Bank) आधारवर आधारित असलेल्या पेमेंट सेवेसाठी (AePS) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा नियम 15 जूनपासून प्रत्यक्ष लागू केला जाणार आहे.

मुंबई, 1 जून : आजपासून (1 जून 2022) नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. केंद्र सरकारच्या विविध निर्णयांनुसार आजपासून अनेक नियमांमध्ये बदल (Rules Change) होणार आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर (Financial Planning) होणार आहे. विम्याशी संबंधित नवीन नियमही आजपासून लागू होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अनेक नियमांमध्येही बदल होणार आहेत. याशिवाय मोटर इन्शुरन्समधील थर्ड पार्टी प्रीमियमही आजपासून महाग होत आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या प्रमुख विमा योजनांचा प्रीमियम वाढवण्याची घोषणा केली आहे. हे बदलही आजपासून लागू करण्यात येत आहे. या बदललेल्या सर्व नियमांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. टीव्ही 9 भारतवर्षने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. >> स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) होमलोन (Home loan) आजपासून महाग होणार आहे. जर तुम्हीदेखील या बँकेकडून लोन घेतलेले असेल तर या बदलामुळं तुमच्यावर ईएमआयचा भार वाढणार आहे. स्टेट बँकेनं होम लोनसाठी एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट आता 7.05 टक्के झाला आहे. 1 जूनपासून हा नवा दर लागू झाला आहे. यापूर्वी हा दर 6.65 टक्के होता. याशिवाय, होम लोनच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. तो आता 6.25 टक्क्यांवरून 6.65 टक्के इतका झाला आहे.

फूट पॅकेट्सवर असलेल्या विविध चिन्हांचा अर्थ माहिती करुन घ्या, पुढच्या वेळी फायदा होईल

>> अॅक्सिस बँकेने (Axis Bank) पगार आणि बचत खातेधारकांसाठीच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय बचत आणि पगार खात्यांसाठी सरासरी मासिक शिल्लक रुपयांची रक्कम 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये केली आहे. हा नियम 1 जूनपासून लागू झाला आहे. मासिक सरासरी शिल्लक न ठेवल्यास, मेट्रो आणि शहरी भागांतील ग्राहकांसाठी दरमहा 600 रुपये, निमशहरी भागांसाठी प्रति महिना 300 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 250 रुपये प्रति महिना दंड वाढवण्यात आला आहे. >> इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (Post Payment Bank) आधारवर आधारित असलेल्या पेमेंट सेवेसाठी (AePS) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा नियम 15 जूनपासून प्रत्यक्ष लागू केला जाणार आहे. आधार सक्षम पेमेंट सिस्टम सर्व्हिस अंतर्गत (AePS) दर महिन्याला पहिली तीन ट्रान्झॅक्शन मोफत असतील. यामध्ये रोख रक्कम काढणे, रोख रक्कम जमा करणे, मिनी स्टेटमेंट काढणे या सेवांचा समावेश आहे. विनामूल्य सेवा मर्यादेनंतर, AePS च्या मदतीने ट्रान्झॅक्शन करण्यासाठी प्रत्येकवेळी अतिरिक्स जीएसटीसह 20 रुपये शुल्क आकारले जाईल. तर, मिनी स्टेटमेंटसाठी 15 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. >> सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगचा (Mandatory Hallmarking) दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितल्यानुसार, अनिवार्य हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात, 20, 23 आणि 24 कॅरेटचे सोन्याचे दागिने 32 नवीन जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात येतील. याठिकाणी पहिल्या टप्प्याच्या अंमलबाजवणीनंतर सोन्याची पारख आणि हॉलमार्क केंद्रे (एएचसी) स्थापन करण्यात आली आहेत. हॉलमार्किंगचा नियम 16 जून 2021 पर्यंत ऐच्छिक होता. त्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्हे त्याच्या कक्षेत आणले आहेत.

LPG Price: महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त; आता काय आहे नवीन किंमत?

>> आजपासून म्हणजे 1 जूनपासून एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किमतीतही बदल होत आहे. कमर्शियल सिलेंडरच्या किमती कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कमर्शियल सिलेंडरची किंमत 136 रुपयांनी कमी झाली आहे. >> केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांच्या (PMSBY) हप्त्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. या दोन्ही योजनांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी आणि त्या पुढे नेण्यासाठी हप्ता वाढवणं आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. पीएमजेजेबीवायच्या हप्त्यामध्ये दिवसाकाठी 1.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी वार्षिक 330 रुपये आकारले जात होते. मात्र, 1 जूनपासून 436 रुपये भरावे लागणार आहेत. >> प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) वार्षिक हप्ता पूर्वी 12 रुपये होता. त्यामध्ये आठ रुपयांची वाढ करून तो आता 20 रुपये करण्यात आला आहे. आजपासून हा नियम लागू झाला आहे. टक्केवारीच्या आधारावर दोन्ही योजनांचा वाढलेले हप्ते पाहिल्यास, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या हप्त्यामध्ये 32 टक्के आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या हप्त्यामध्ये 67 टक्के वाढ झाली आहे. >> परिवहन मंत्रालयाने मोटर विम्याच्या हप्त्यामध्ये (Motor Insurance Premiums) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक वाहनांसाठीचा थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम आजपासून महाग झाला आहे. दुचाकी वाहनांबद्दल बोलायचे झाल्यास, 75 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या गाड्यांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 538 रुपयांवर गेला आहे. 75-150 सीसी इंजिनच्या गाड्यांचा हप्ता 714 रुपये आहे तर 150-350 सीसीच्या वाहनांसाठीचा हप्ता एक हजार 366 रुपये आहे. 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या गाड्यांसाठीचा विमा हप्ता दोन हजार 804 रुपये करण्यात आला आहे. >> चारचाकी वाहनांच्या विमा हप्त्यामध्येही वाढ झाली आहे. 1000 सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या खासगी कारसाठीचा थर्ड पार्टी प्रीमियम दोन हजार 94 रुपये, 1000-1500 सीसीच्या कारसाठी तीन हजार 416 रुपये आहे आणि 1500 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी सात हजार 897 रुपये करण्यात आला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या शेवटी विमा हप्ता वाढवण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाच्या काळात कोणतेही बदल झाले नव्हते. >> आजपासून (1 जून) जेट इंधनाच्या (Jet Fuel) किमतीतही बदल होऊ शकतो. 1 आणि 16 तारखेला, म्हणजे महिन्यातून दोनदा जेट इंधनाची किंमत बदलते. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 16 मे 2022 रोजी जेट इंधनाच्या किमती सहा हजार 188 रुपये प्रति किलोलीटरने वाढवल्या होत्या. एटीएफच्या दरात ही सलग दहावी वाढ आहे. हा दर 31 मे पर्यंत आहे तसाच होता. या वर्षी जेट इंधनाच्या किमती 61.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून महिन्यात वरील बदल होणार आहे. तुम्ही जर यापैकी कुठल्याही गोष्टींशी निगडीत असाल तर तुम्हाला नवीन नियमांनुसार व्यवहार करावे लागणार आहेत.
First published:

Tags: Investment, Money

पुढील बातम्या