मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दररोज करा 150 रुपयांची गुंतवणूक, मुदतीनंतर मिळेल दुप्पट रक्कम

दररोज करा 150 रुपयांची गुंतवणूक, मुदतीनंतर मिळेल दुप्पट रक्कम

अत्यंत सुरक्षित आणि उत्कृष्ट व्याजदर असलेली ही योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवले, तर 20 वर्षांच्या मुदतीमध्ये तुम्हाला 20 लाख रुपयांहून जास्त निधी मिळेल.

नवी दिल्ली, 6 मे : सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य माणसाला बचत (Savings) करणं खूप अवघड झालं आहे. अशा स्थितीत अगदी कमी बचत करून देखील मोठा निधी जमा करणाऱ्या काही सरकारी योजना दिलासा देणाऱ्या आहेत. यापैकीच एक योजना आहे पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF). अत्यंत सुरक्षित आणि उत्कृष्ट व्याजदर असलेली ही योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवले, तर 20 वर्षांच्या मुदतीमध्ये तुम्हाला 20 लाख रुपयांहून जास्त निधी मिळेल. तज्ज्ञांच्या मते, काही अनावश्यक दैनंदिन खर्च कमी केले, तर दररोज 100 ते 150 रुपये वाचवणे सहज शक्य आहे. ही रक्कम छोट्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवली तर त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. 20 लाख रुपयांहून अधिक रक्कम कशी मिळेल - तुम्ही 25 वर्षांचे असाल, तर गुंतवणूक सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. लहानशी रक्कम गुंतवून मोठा परतावा मिळवण्यासाठी या वयापासून पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास 45व्या वर्षापर्यंत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते. तुमचे मासिक उत्पन्न 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत असेल तर इतर कोणत्याही प्रकारच्या बचतीबरोबरच दररोज 100 ते 150 रुपये बचत सहज शक्य आहे. दिवसाला 150 रुपये याप्रमाणे महिन्याला 4500 हजार रुपये तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवले, तर तुमची वार्षिक गुंतवणूक 54 हजार रुपये होईल. याप्रमाणे 20 वर्षातील तुमची एकूण गुंतवणूक 10 लाख 80 हजार रुपये होईल. यावर वार्षिक 7.1 टक्के दरानं चक्रवाढ व्याज मिळेल. त्यामुळे 20 वर्षांत तुम्हाला 20 लाखांहून अधिक रुपयांचा निधी मिळेल.

(वाचा - निवृत्तीनंतर खात्रीशीर नियमित उत्पन्न हवंय? जाणून घ्या नव्या पेन्शन प्लानविषयी..)

पीपीएफ खात्याचे फायदे - - हे खाते केवळ 100 रुपयांनी उघडता येते. संयुक्त खातं देखील उघडता येतं. - खातं उघडतानाच नामनिर्देशन करता येते. 15 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर दोन वेळा 5 वर्षांनी याची मुदत वाढवता येते. - यातून मिळणारा परतावा करमुक्त आहे. तिसर्‍या आर्थिक वर्षापासून यावर कर्जही घेता येते. बँका, पोस्ट ऑफिस इथे पीपीएफ खातं उघडता येतं. - सध्या पीपीएफवर 7.1 टक्के दरानं चक्रवाढ व्याज मिळतं. एका खात्यात एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे, तसंच तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.
First published:

पुढील बातम्या