Home /News /money /

PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे काय आहेत फायदे, पाहा तुमच्या फायद्याच्या या 7 गोष्टी

PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे काय आहेत फायदे, पाहा तुमच्या फायद्याच्या या 7 गोष्टी

PPF चे असे 7 फीचर्स आहेत, जे लोकांना या योजनेकडे आकर्षित करू शकतात. वाचा कमी गुंतवणुकीत आर्थिकदृष्ट्या तुमच्या फायद्याची बातमी....

    नवी दिल्ली, 2 मे : तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगले रिटर्न्स देणारी, तसंत सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एक सरकारी योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. पब्लिक प्रोविडेंट फंड (पीपीएफ PPF) मध्ये सध्या 7.10 टक्के व्याजाने रिटर्न्स मिळतात. पीपीएफमध्ये मिळणारे रिटर्न्स टॅक्स फ्री असतात. पीपीएफ गुंतवणुकीत सरकारचं चांगलं संरक्षणही मिळतं. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार PPF चे असे 7 फीचर्स आहेत, जे लोकांना या योजनेकडे आकर्षित करू शकतात. पीपीएफ टेन्योर - याची मॅच्योरिटी 15 वर्षांची असते. ही योजना 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही 5 वर्षाच्या ब्लॉकमध्ये वाढवता येते. निश्चित रिटर्न्स - या योजनेत तुमच्या गुंतवणुकीवर एक सुनिश्चित रिटर्न मिळतात. हे फिक्स रिटर्न्स नसतात. याचा व्याजदर सरकारकडून दर तिमाहीमध्ये रिवाइज केला जातो. सध्या याचा व्याजदर 7.1 टक्के आहे. जर 7 टक्क्यांच्या हिशोबाने नियमित गणना केल्यास गुंतवणूकदार रिटायरमेंटपर्यंत 1 कोटीपर्यंतही रुपये जमा करू शकतो. स्वस्त लोन - पीपीएफ खात्यातून आप्तकालीन स्थितीत स्वस्त कर्जही मिळू शकतं. पीपीएफ लोन नियमांनुसार, खातं सुरू करण्यासाठी 3 ते 6 वर्षापर्यंत अकाउंटवर लोन घेता येतं. पीपीएफ कर्जचा व्याजदर केवळ 1 टक्के इतका असतो. काही रक्कम काढण्याची सोय - पीपीएफ खातं सुरू केल्यानंतर सहाव्या आर्थिक वर्षात तुम्ही या अकाउंटमधून पैसे काढू शकता. परंतु खात्यातून केवळ 50 टक्केच रक्कम काढता येईल. बाकी रक्कम खात्यातच ठेवली जाईल. टॅक्स सूट - या योजनेमुळे तुम्हाला टॅक्स बचतीसाठी मदत होते. तुम्ही पीपीएफमध्ये 1.5 लाखपर्यंतच्या गुंतवणुकीवर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स वाचवू शकता. प्रीमॅच्योर क्लोजर - PPF खातं 15 वर्षानंतर मॅच्योर होतं. परंतु तुम्ही पाच वर्षानंतर ते प्रीमॅच्योरिली बंद करू शकता. हे खातं गुंतवणुकदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार झाल्यास बंद करता येतं. तसंच खातेदारकाला त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठीही हे खातं मध्येच बंद करता येऊ शकतं.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Open ppf account, Post office saving, PPF, Savings and investments

    पुढील बातम्या