मुंबई : बऱ्याचदा ग्रामीण भागांत पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा पोस्टात सारखं जावं लागतं. याचं कारण तिथे जागोजागी ATM ची सुविधा नसते. पण अडीअडचणीच्या काळात पैसे काढण्यासाठी अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागात नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पोस्टानं अनोखी सेवा सुरू केली आहे. या सेवेला ग्रामीण भागातील लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागात UPI पेमेंट किंवा ATM ची तेवढी मोठी सुविधा नसल्याने अनेकदा अडचणीच्या काळात पैसे लागले तर काढायचे कसे असा प्रश्न निर्माण होतो. पोस्टात जाऊन पैसे काढण्यासाठी एख्खी विरड मोडते. अडचणीच्या काळात ते शक्य नसतं. पण हीच गरज ओळखून पोस्टानं नागरिकांसाठी एक योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला तुमच्या पोस्ट खात्याला आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला नंबर द्यायचा आहे. तुम्ही पोस्टमनकडून तुम्हाला अडचणीच्या काळात पैसे घेता येणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना काय करावं लागणार आहे आणि ही योजना काय आहे ते जाणून घेऊया.
कमी वयातही श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला, बस दर महिन्याला करा ‘हे’ कामग्राहकाचं पोस्टात किंवा बँकेत खातं असायला हवं. त्याला आधार कार्ड लिंक हवं. खात्यातून बोटांचे ठसे देऊन पैसे काढता येतात आणि शिल्लक रक्कमही तपासता येते. पैसे काढण्यासाठी ग्राहकाला पोस्टमनकडे बोटांच्या हातांचे ठसे मशीनवर द्यावे लागतात. त्यानंतर पोस्टमन पैसे देऊ शकतो. ग्राहकांकडे आधार क्रमांक असणं बंधनकारक आहे. एका दिवसात ग्राहकाला १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. ही योजना महाराष्ट्र आणि गोवा इथल्या ग्रामीण भागांमध्ये राबवली जात आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
Post Office Scheme : फक्त 95 रुपये गुंतवा आणि मिळवा 14 लाख रुपयांचा रिटर्नग्राहकाला बँकेत किंवा पोस्टात जाण्याचे श्रम वाचावेत आणि अडचणीच्या काळात पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळे बँक ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचं महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्टर वीणा श्रीनिवास म्हणाल्या आहेत. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.