मुंबई : भारतात आजही अनेकांना कमी जोखमी असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवण्यावर विश्वास ठेवतात. जेवढी जास्त रिस्क तेवढा पैसे यापेक्षा कमी जोखीम पण आपले पैसे कुठे जाणार नाहीत याचं आश्वासन मिळालं तरच ते गुंतवणूक करण्यासाठी तयार होतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणूक करुन जास्त रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्ही फक्त दिवसाला ९५ रुपये गुंतवायचे आहेत. ही योजना आहे. सुमंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना आहे. ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही मोठी कमाई करू शकता. ही एक मनी बॅक योजना आहे. या योजनेत ग्रामीण भागातील लोकांसाठी जास्त फायदा होणार आहे. दुर्बल घटकांसाठी किंवा ज्यांना जेमतेम पैसे मिळतात अशा महिला किंवा पुरुष यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेची हमी सरकारने दिली आहे. या योजनेत कसे पैसे गुंतवू शकता याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही-ग्राम सुमंगल योजना ही एक मनी बॅक स्कीम आहे. यामध्ये ठरावीक कालावधीनंतर तुम्हाला पैसे रिटन मिळतात -गुंतवणूकदारांच्या मृत्यूनंतरही याचा लाभ नॉमिनलला घेता येतो - जर मॅच्युरिटीआधी गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला तर नॉमिनीला काही ठरावीक रक्कम मिळू शकते. - या योजनेमध्ये 19 वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंत महिला किंवा पुरुष गुंतवणूक करू शकतात. - कमीत कमी १५ ते २० वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराला १० वर्षांपर्यंत सम एश्योर्ड रक्कम मिळते. तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर २० टक्के मनी बॅक पॉलिसा ६, ९ आणि १२ वर्षांनी मिळणार आहे. बाकी ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीवर मिळणार आहे. जर तुम्ही २० वर्षांसाठी ही पॉलिसी काढली असेल तर तुम्हाला ८, १२ आणि १६ वर्षांनी मनी बॅक पैसे मिळणार आहेत. उर्वरित ४० टक्के रक्कम ही मॅच्युरिटीनंतर मिळणार आहे. आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया, तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी ही योजना खरेदी करता. तुम्ही १ लाख रुपये २० वर्षांसाठी गुंतवले. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला २६५३ रुपये पैसे भरावे लागतील. दिवसाला तुम्हाला ९५ रुपये भरायचे आहेत. मॅच्युअरिटीपर्यंत व्याजासकट ही रक्कम १४ लाख रुपये होते. त्यापैकी तीन टप्प्यात तुम्हाला 20 टक्के रक्कम मनी बॅक मिळणार आहे. उर्वरित रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणार आहे.