• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Post Office च्या या योजनेत मिळतील 14 लाख 28 हजार, वाचा काय आहे स्कीम

Post Office च्या या योजनेत मिळतील 14 लाख 28 हजार, वाचा काय आहे स्कीम

पोस्ट ऑफिस सीनिअर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस-SCSS) अर्थात ज्येष्ठ नागरिक बचत योजना. पोस्ट ऑफिसच्या या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज (Interest Rate) मिळते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : सर्वसामान्य नागरिकांमध्ये गुंतवणुकीचा (Investment) सुरक्षित मार्ग म्हणून भारतीय पोस्ट विभागाद्वारे (Indian Post Office) चालवल्या जाणाऱ्या विविध अल्प बचत योजना (Small Savings Scheme) लोकप्रिय आहेत. सर्व वयोगटातील लोकांना अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळेल अशा योजना पोस्टाद्वारे चालवल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) पोस्टाद्वारे काही विशेष योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना आहे, पोस्ट ऑफिस सीनिअर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस-SCSS) अर्थात ज्येष्ठ नागरिक बचत योजना. या योजनेद्वारे फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा निधी साठवणं सहज शक्य आहे. पोस्ट ऑफिसच्या या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज (Interest Rate) मिळते. 14 लाख रुपये कसे मिळतात या ज्येष्ठ नागरिक योजनेत तुम्ही एक रकमी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत तर, 5 वर्षानंतर म्हणजेच मुदतपूर्तीनंतर तुम्हाला 14 लाख 28 हजार 964 रुपये मिळतील. या योजनेत 7.4 टक्के दराने चक्रवाढ व्याज मिळते. त्यामुळे दहा लाखांच्या गुंतवणूकीवर तुम्हाला 5 वर्षात 4 लाख 28 हजार 964 रुपये व्याज मिळेल. `या` कायद्यानुसार पत्नीला मिळणाऱ्या आर्थिक लाभावर नसतो पतीचा हक्क कर सवलतीचाही लाभ या योजनेअंतर्गत 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त व्याजावर टीडीएस (TDS) कापला जातो, मात्र ज्येष्ठ नागरिकांना या बचत योजनेत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत कर लाभही (Tax Benefit) मिळतो. कोण खाते उघडू शकते? - 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक या योजनेत खाते उघडू शकतात. - स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तीदेखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. - या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत 5 वर्षे आहे, मात्र ती 3 वर्षांनी वाढवण्याचीही तरतूद आहे. मुदतपूर्तीनंतर कालावधी वाढवण्यासाठी, खातेदाराला पोस्ट ऑफिसमध्ये एक अर्ज करावा लागतो. - या योजनेअंतर्गत, कमीत कमी 1 हजार रुपयांनी खाते उघडता येते. इतकं स्वस्त सोनं कुठेच मिळणार नाही! एका तोळ्यावर 'इतकी' सूट; सॉव्हरियन गोल्ड बाँड स्किमची सीरिज सुरू संयुक्त खाते उघडण्याचीही सुविधा : या योजनेअंतर्गत, एक ठेवीदार वैयक्तिकरित्या (Single Account) आणि त्याच्या जोडीदारासह संयुक्त खाते (Joint account) अशी एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतो. मात्र संयुक्त खात्याद्वारे कमाल 15 लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येते. त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची मुभा नाही. या योजनेत खाते उघडताना नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
  First published: