Home /News /money /

इतकं स्वस्त सोनं कुठेच मिळणार नाही! एका तोळ्यावर 'इतकी' सूट; सॉव्हरियन गोल्ड बाँड स्किमची सीरिज सुरू

इतकं स्वस्त सोनं कुठेच मिळणार नाही! एका तोळ्यावर 'इतकी' सूट; सॉव्हरियन गोल्ड बाँड स्किमची सीरिज सुरू

विशेष म्हणजे यासाठी डिजिटली व्यवहार केल्यास आकर्षक सूट देखील देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 30 ऑगस्ट:  सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमता आणि गरजेनुसार या पर्यायांमध्ये गुंतवणुक करु शकतो. यातील काही जणांना गुंतवणुकीतून लगेच परतावा अपेक्षित असतो, तर काही जण दीर्घकालीन गुंतवणुकीचाही विचार करतात. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये सोन्यातील (Gold) गुंतवणुकीकडे बहुतांश जणांचा कल असतो. कोरोना काळात तर लोकांनी सोन्यातील गुंतवणुकीला (Investment) काही प्रमाणात प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सोन्यात गुंतवणुक करण्यासाठी सॉव्हरियन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) हा एक चांगला पर्याय आहे. सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सरकार नागरिकांना स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आज (30 ऑगस्ट) सॉव्हरियन गोल्ड बाँड स्किम 2021-22 च्या सहाव्या सीरीजची (Sovereign Gold Bond Scheme Series VI) विक्री सुरु होत आहे. यासाठी 4732 रुपये प्रति ग्रॅम अशी इश्यु प्राईज (Issue Price) ठरवण्यात आली आहे. ही योजना केवळ 5 दिवस म्हणजेच 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2021 पर्यंत खुली राहणार आहे. विशेष म्हणजे यासाठी डिजिटली व्यवहार केल्यास आकर्षक सूट देखील देण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट सॉव्हरियन गोल्ड बाँड स्किममध्ये तुम्ही 4732 रुपये प्रतिग्रॅम दराने सोनं खरेदी करु शकता. जर तुम्ही 10 ग्रॅम सोनं खरेदी केल तर त्याची किंमत 47320 रुपये होते. मात्र या योजनेतून ऑनलाइन खरेदी करणाऱ्या आणि डिजीटल पेमेंट (Digital Payment) करणाऱ्या गुंतवणुकदारांना 50 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ ऑनलाइन सोनं खरेदी केल्यास सोन्याचा दर प्रतिग्रॅम 4682 रुपये असे असेल. कुठे खरेदी कराल सॉव्हरियन गोल्ड बाँड? सॉव्हरियन गोल्ड बाँड सर्व बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिसेस, अधिकृत स्टॉक एक्सचेंज, एनएसई (NSE) आणि बीएसईच्या (BSE) माध्यमातून विक्री केले जाणार आहेत. स्मॉल फायनान्स बॅंका आणि पेमेंट बॅंकांमधून याची विक्री होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. बाँड खरेदीची मर्यादा जास्तीत जास्त 4 किलोग्रॅमपर्यंत सॉव्हरियन गोल्ड बाँड आरबीआयकडून जारी केले जातात. सॉव्हरियन गोल्ड बाँड स्किममधून एका अर्थिक वर्षात एक व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलोग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करु शकते. तसेच किमान गुंतवणुक ही एक ग्रॅम असणं आवश्यक आहे. तसेच ट्रस्ट आणि समकक्ष संस्था 20 किलोग्रॅमपर्यंतचे सोन्याचे बाँड खरेदी करु शकतात.
    First published:

    Tags: Gold, Gold price, Money, Savings and investments

    पुढील बातम्या