जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही

Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही

Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही

Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसकडं प्रत्येक भारतीय नागरिक विश्वासाच्या नजरेनं पाहतो. कारण येथील योजना या सरकार पुरस्कृत असतात. त्यामुळं पैसे सुरक्षित राहण्याची हमी मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या तीन सर्वोत्तम बचत योजनांबद्दल सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 ऑक्टोबर: महागाई आणि अस्थिरतेनं भरलेल्या परिस्थितीत प्रत्येकजण आपण कष्टानं कमावलेला पैसा सुरक्षित कसा राहील आणि त्यात भर कशी पडेल याचा विचार करत असतो. अशा खूप कमी योजना आहेत ज्यात तुम्हाला नियमित परतावा मिळू शकतो आणि पैसे गमावण्याचा धोकाही नसतो. आज आम्ही तुम्हाला अशा 3 योजनांबद्दल सांगणार आहोत. या तिन्ही योजना पोस्ट विभागाच्या आहेत. पोस्ट ऑफिसकडे प्रत्येक भारतीय विश्वासानं पाहतो. कारण येथील योजना या सरकार पुरस्कृत असतात. त्यामुळं पैसे सुरक्षित राहण्याची हमी मिळते. इतकंच नाही तर बदलत्या काळानुसार पोस्ट ऑफिस लहान बचत योजनांवरही चांगला परतावा देत आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव- जर तुम्हाला सुरक्षित आवर्ती ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. येथे तुम्हाला 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसह गुंतवणूक पर्यायावर 5.8 टक्के व्याज मिळत आहे. तुम्ही या योजनेत फक्त 100 रुपये प्रति महिना गुंतवणूक सुरू करू शकता. त्याच वेळी, त्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही उच्च मर्यादा नाही. **हेही वाचा:** स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना अलर्ट! या नंबरवरुन कॉल तर आला नाही? लगेच चेक करा  पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट: ही एफडीसारखी स्कीम आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला 1 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवीत 5.5 टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही 5 वर्षांच्या एकरकमी ठेव योजनेत गुंतवणूक करावी. येथे तुम्हाला 6.7 टक्के व्याज मिळेल. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर सूटही मिळू शकते. तुम्ही येथे 1,000 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता.  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र- याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. येथे तुम्हाला 6.8 टक्के रिटर्न मिळेल. तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत 1000 रुपयांच्या गुंतवणुकीसह गुंतवणूक सुरू करू शकता. तथापि काही अपवाद वगळता, तुम्ही 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच या योजनेतून पैसे काढू शकता. या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कायद्यांतर्गत कर सवलतीसाठी देखील पात्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात