जाहिरात
मराठी बातम्या / मनी / NPS मधील गुंतवणुकीत उत्तम परताव्याची संधी, दिवसाला 150 रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर मिळतील 1 कोटी रुपये

NPS मधील गुंतवणुकीत उत्तम परताव्याची संधी, दिवसाला 150 रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर मिळतील 1 कोटी रुपये

फाईल फोटो

फाईल फोटो

कोणतीही गुंतवणूक कमी वयात करणं फायदेशीर असतं.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : पैसे कमावण्याबरोबरच त्याची बचत करणं व त्याहीपेक्षा जास्त तो योग्य ठिकाणी गुंतवणं महत्त्वाचं असतं. भविष्य सुरक्षित करण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. पैसे गुंतवण्याचे आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एनपीएस म्हणजेच न्यू पेन्शन सिस्टीम हा कमी धोका असलेला एक पर्याय आहे. त्यात गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगला परतावा मिळू शकतो व निवृत्तीनंतरचं आयुष्य सुरक्षित करता येऊ शकतं. ‘झी न्यूज हिंदी’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. कोणतीही गुंतवणूक कमी वयात करणं फायदेशीर असतं. एनपीएस हीदेखील एक पेन्शन योजना आहे. त्यामुळे जितक्या लवकर त्यात गुंतवणूक करता येईल, तितका परतावा अधिक मिळू शकतो. मात्र ही योजना शेअर बाजाराशी संबंधित असल्यानं त्यात थोडी जोखीम असते. या योजनेअंतर्गत एनपीएसमधील पैसे 2 ठिकाणी गुंतवले जातात. इक्विटी म्हणजेच शेअर बाजार आणि डेट फंड्स म्हणजे सरकारी किंवा कॉर्पोरेट बाँड्स. तुमच्या गुंतवणुकीतील किती पैसे इक्विटीमध्ये जातील, हे तुम्ही योजना सुरु करतानाच ठरवू शकता. सर्वसाधारणपणे 75 टक्के पैसे इक्विटीमध्ये गुंतवले जातात. याचाच अर्थ यातून पीपीएफ किंवा ईपीएफपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. तरुणवयात नोकरी करत असाल व जास्त पगार नसेल, तरीही रोजचे 150 रुपये वाचवून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. उदा. तुम्ही 25 वर्षांचे असाल, तर एका दिवसाला 150 याप्रमाणे महिन्याला 4500 रुपयांची गुंतवणूक तुम्ही करत असाल, तर आणखी 35 वर्षं ही गुंतवणूक करावी लागेल. यात कमीतकमी 8 टक्के दरानं परतावा मिळाला, तरी 60 वर्षानंतर निवृत्ती घेतल्यावर तुमच्याकडे 1 कोटी इतकी रक्कम जमा असेल. हेही वाचा -  सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा हा आहे प्रभावी मार्ग एनपीएस गुंतवणुकीची माहिती एकूण गुंतवणूक केली 18.90 लाख रुपये एकूण व्याज मिळालं 83.67 लाख रुपये निवृत्ती रक्कम 1.02 कोटी रुपये एकूण करबचत 5.67 लाख रुपये निवृत्तीवेतन अ‍ॅन्युइटी 40 टक्के अपेक्षित व्याजदर 8 टक्के एकरकमी पैसे 61.54 लाख रुपये दरमहा निवृत्तीवेतन 27353 रुपये या योजनेत मिळालेली संपूर्ण रक्कम काढता येत नाही. त्यातील 60 टक्के रक्कम काढता येते व उरलेली 40 टक्के रक्कम अ‍ॅन्युइटी योजनेत गुंतवावी लागते. यामुळे तुम्हाला दर महिना निवृत्तीवेतन मिळतं. समजा 1.02 कोटी रुपयांपैकी 40 टक्के रक्कम अ‍ॅन्युइटीमध्ये ठेवली. तर 61.54 लाख रुपये तुम्ही काढू शकता. व्याज 8 टक्के असेल, तर महिन्याला 27,353 रुपये पेन्शन मिळू शकेल. गुंतवणुकीच्या कोणत्याही योजनेचा परतावा तुम्ही कोणत्या वयात गुंतवणूक करता, व्याजदर किती असतो व किती रक्कम गुंतवता यावर अवलंबून असतो. लवकर गुंतवणूक सुरु केली, तर अधिक पैसे मिळू शकतात. मात्र व्याजदर किती मिळतो, यावरही हे मूल्य ठरतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात