Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Charging Station Business : चार्जिंग स्टेशन सुरु करा, कमी गुंतवणुकीत कमवा लाखो रुपये

Charging Station Business : चार्जिंग स्टेशन सुरु करा, कमी गुंतवणुकीत कमवा लाखो रुपये

असं सुरु करा इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन

असं सुरु करा इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने ती चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची गरज आहे. हे चार्जिंग स्टेशन उघडणे देखील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे. जेव्हा काही वर्षांनी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल, तेव्हा तुमचा नफाही वेगाने वाढत जाईल.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 जानेवारी : सध्या देशात इलेक्ट्रिक व्हेईकलची (Electric Vehicle) मागणी वाढते आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी पायाभूत सुविधा ( infrastructure ) उभारणीला चालना देण्यासाठी सरकारकडून ( government ) विविध योजना ( schemes ) राबवल्या जात आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. तर अद्यापही काहीजण हे वाहन खरेदी करताना त्यांच्या शहरांमध्ये, गावात चार्जिंग स्टेशन (charging station) आहे का, याचाही विचार करतात. इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारचा ग्राहक मोठ्या संख्येने वाढत असताना, या संधीचा फायदा घेत तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. हे चार्जिंग स्टेशन कसं उघडायचं, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. टीव्ही 9 हिंदीने याबाबत वृत्त दिलंय.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वाढला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेचा विचार करूनही अनेकजण इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे येणारा काळ हा या वाहनांचा असणार, असे म्हणता येईल. रस्त्यांवर या वाहनांची संख्या वाढत असल्याने ती चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची गरज आहे. हे चार्जिंग स्टेशन उघडणे देखील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे. जेव्हा काही वर्षांनी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल, तेव्हा तुमचा नफाही वेगाने वाढत जाईल. चार्जिंग स्टेशन हे कमाईचे असे साधन ठरेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल.

Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उघडण्याची प्रक्रिया कशी असते, ते सांगणार आहोत. या व्यवसायाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी खर्चांत तुम्हाला मोठा नफा मिळेल. ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत, त्या लक्षात ठेवल्यानंतर, तुम्ही चार्जिंग स्टेशन सहज उघडू शकता. ऊर्जा मंत्रालयाने (Energy Ministry) काही नियम आणि अटी जारी केल्या आहेत. त्यानुसार, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन (Public Charging Stations-PCS) उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सर्व संबंधित उपकरणांसह एक विशेष ट्रान्सफॉर्मर असणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्लग-इन नोजल, 33/11 केव्ही केबल, सर्किट ब्रेकर असणं आवश्यक आहे. चार्जिंग स्टेशनमध्ये किमान एक इलेक्ट्रिक किऑस्क असणंदेखील आवश्यक आहे, ज्यामध्ये अनेक चार्जिंग पॉइंट्स असतील आणि त्यात गरजेनुसार वाढही करता येईल.

पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे कमीत कमी 300 ते 500 चौरस फूट जागा असावी, जेणेकरून एकावेळी 2-3 कार सहज चार्ज करता येतील. फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 16.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये वीज, देखभाल, चार्जिंग उपकरणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही तुमचं चार्जिंग स्टेशन 16 तास सुरू ठेवल्यास प्रति युनिट 3.5 रुपये दराने शुल्क आकारून तुम्ही चार वर्षांतच तुमचा संपूर्ण खर्च वसूल करू शकता. पब्लिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल. याशिवाय टाटा पॉवर, डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॉल्ट, पॅनसोनिक यांसारख्या चार्जिंग स्टेशन स्थापन करणाऱ्या कंपन्यांशीही तुम्ही संपर्क साधू शकता.

फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट

लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर 100 kW क्षमतेचे दोन चार्जर्स असणं आवश्यक आहे. मात्र, बससारख्या अवजड वाहनांसाठी बस डेपोजवळील चार्जिंग स्टेशनला प्राधान्य दिले जाईल. वेगवान चार्जर बसवायचा असल्यास चार्जिंग स्टेशनवर लिक्विड कूल्ड केबल वापरावी लागेल.

पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, विद्युत निरीक्षक अर्थात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडून मंजुरी मिळणं आवश्यक असेल. स्थानिक वितरण कंपनीद्वारे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची (Electrical Inspector) नियुक्ती केली जाते. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल. याशिवाय, वाहन चार्ज करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याकरिता ऑनलाइन नेटवर्क सेवा उपलब्ध करावी लागेल. त्याकरिता अशी सेवा देणाऱ्या पुरवठादार कंपनीशी संपर्क साधावा लागेल. चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी जमीन भाड्यानेही घेतली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल.

तुम्ही जर आताच पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू केले, तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची संधी या व्यवसायातून उपलब्ध होईल.

First published:

Tags: Auto expo, Business, Electric vehicles