जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खुशखबर! 'या' क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर

खुशखबर! 'या' क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर

खुशखबर! 'या' क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर

मायकेल पेज सॅलरी रिपोर्ट-2022 मध्ये असे नमूद केले आहे की भारतीय कंपन्या गुंतवणुकीबाबत अधिक सकारात्मक आहेत. गुंतवणुकीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल : कोरोना महामारीच्या (Corona Crises) तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने देशाच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीला वेग आला आहे. देशांतर्गत कंपन्यांच्या कमाईवरही याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. वाढत्या कमाईमुळे, कंपन्या यावर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) नवीन भरती करण्याबरोबरच वाढ करण्याचा विचार करत आहेत. यावर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते, असे ताज्या अहवालात समोर आलं आहे. मात्र ही वेतनवाढ (Salary Hike) कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित असेल. याचा अर्थ उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार अधिक वाढू शकतो, तर सरासरी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगारही त्यानुसार वाढू शकतो. मायकेल पेज सॅलरी रिपोर्ट-2022 मध्ये (Michael Page Salary Report-2022) असे नमूद केले आहे की भारतीय कंपन्या गुंतवणुकीबाबत अधिक सकारात्मक आहेत, विशेषत: उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात सकारात्मक आहेत. गुंतवणुकीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. EPFO News: पीएफचं मागील वर्षाचं व्याज लवकरच खात्यात जमा होणार? किती पैसे जमा झाले सोप्या पद्धतीने तपासा सामान्य पगारात 9 टक्क्यांपर्यंत वाढ अहवालात असे म्हटले आहे की सामान्य पगारवाढीची शक्यता 9 टक्के आहे. 2019 मध्ये साथीच्या आजारापूर्वी, भारतीय कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 7 टक्क्यांनी वाढ केली होती. युनिकॉर्नच्या सहकार्याने स्टार्टअप्स आणि नवीन कंपन्या पगारात सर्वाधिक वाढ करतील असे त्यात पुढे म्हटले आहे. या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 12 टक्क्यांनी वाढ करू शकतात. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, ‘अशा’ प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा या क्षेत्रांमध्ये पगार वाढेल यावर्षी ज्या क्षेत्रांमध्ये पगार वाढण्याची शक्यता आहे त्यात प्रामुख्याने बँकिंग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट, बांधकाम आणि उत्पादन यांचा समावेश आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतात ई-कॉमर्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधून जाणारे इतर क्षेत्र देखील पगार वाढवतील. कॉम्युटर सायन्स पार्श्वभूमी असलेले कर्मचारी पगारवाढीवर अधिक वाटाघाटी करण्याच्या स्थितीत असतील. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक फायदे डेटा सायंटिस्ट, वेब डेव्हलपर आणि क्लाउड आर्किटेक्ट यांनाही जास्त मागणी असू शकते, असे अहवालात म्हटले आहे. याशिवाय कंपन्या त्या कर्मचाऱ्यांना जास्त पगार देऊन कायम ठेवतील, ज्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. ते अशा कर्मचाऱ्यांना त्रैमासिक किंवा सहामाही पगारवाढ देऊ शकतात. यासोबतच ते कंपनीतील काही शेअर्सही देऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , Salary
  • First Published :
जाहिरात
जाहिरात