नवी दिल्ली, 10 डिसेंबर: जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर हा नवीन नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून एका महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहे. इंडिया पोस्ट (India Post) ने पोस्ट ऑफिस बचत खात्यामधील मिनिमम बॅलन्स (Post Office Savings Account) जमा करण्यासाठीची डेडलाइन निश्चित केली आहे. इंडिया पोस्टने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटनुसार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक 500 रुपये जमा असणं आवश्यक आहे. उद्या म्हणजेच 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात ही रक्कम जमा असणं आवश्यक आहे.
याआधी इंडिया पोस्टने त्यांच्या ग्राहकांना याबाबत आठवण करून देणारा मेसेज देखील पाठवला होता. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असणं अनिवार्य आहे, असं या मेसेजमधून सांगण्यात आलं होतं. जर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज द्यायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 आधी तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी 500 रुपये जरुर मेंटेन करा.
डाक घर बचत खाता में न्यूनतम अधिशेष रखना हुआ अनिवार्यl#MyPostIndiaPost pic.twitter.com/eJUfrUfW7M
— India Post (@IndiaPostOffice) December 10, 2020
Now maintaining minimum balance in Post Office Savings Account is mandatory.#MyPostIndiaPost pic.twitter.com/0E0ilfVU2c
— India Post (@IndiaPostOffice) December 9, 2020
इंडिया पोस्टच्या माहितीनुसार, जर 11 डिसेंबर 2020 नंतर तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक 500 रुपये नसतील तर तुमच्याकडून आर्थिक वर्षाच्या शेवटी 100 रुपयांचे मेंटेनन्स शुल्क कापले जाईल.
(हे वाचा-सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर)
इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, व्यक्तिगत किंवा संयुक्त स्वरुपात पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यासाठी सध्या 4 टक्के दराने व्याज मिळते आहे. या खात्यावर मिळणारे व्याज महिन्याची 10 तारीख आणि शेवटची तारीख या दरम्यान असणाऱ्या शिल्लक रकमेच्या (Minimum Balance) आधारावर निश्चित केलं जातं. जर या दरम्यान एखाद्याच्या खात्यामध्ये 500 रुपयांपेक्षा कमी शिल्लक रक्कम असेल तर त्यावर व्याज मिळत नाही. तुम्ही तुमच्याजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बचत खातं उघडू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Post office, Post office balance