Home /News /money /

सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर

सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Petrol-Diesel Price 10 December 2020 : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचने नवे दर जारी करण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर: तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. (Petrol-Diesel Price) देशातील प्रमुख 10 शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थीर आहेत, त्यामुळे सामान्यांना काहीसाच दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल. असं असलं तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर सप्टेंबर 2018 नंतर अर्थात 2 वर्षानंतर सर्वोच्च स्तरावर आहेत. याआधी 7 डिसेंबर पर्यंत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्आ किंमतीत सातत्याने वाढ  केली होती. या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. WTI क्रूड ऑइलचे भाव 0.44 टक्क्यांनी वाढून 45.72 डॉलर झाले आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑइलची (Brent Crude Oil) किंमत 0.41 टक्क्यांनी वाढून 49.06 डॉलर प्रति झाली आहे. देशातील मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिल्ली- पेट्रोल 83.71 रुपये आणि 73.87 रुपये लीटर मुंबई- पेट्रोलचे दर 90.34 रुपये आणि डिझल 80.51 रुपये लीटर कोलकाता- पेट्रोल 85.19 रुपये आणि डिझल 77.44 रुपये लीटर चेन्नई- पेट्रोल 86.51 रुपये आणि डिझलचे दर 79.21 रुपये लीटर (हे वाचा-या नोकरदारांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता खात्यामध्ये येणार जास्त पगार) नोएडा- पेट्रोल 83.67 रुपये आणि 74.29 रुपये लीटर लखनऊ- पेट्रोल 83.59 रुपये आणि 74.21 रुपये लीटर पाटणा- पेट्रोल 86.25 रुपये आणि 79.04 रुपये लीटर चंदीगड- पेट्रोल 80.59 रुपये आणि 73.61 रुपये लीटर बेंगळुरु- पेट्रोल 86.51 रुपये आणि 78.31 रुपये लीटर अहमदाबाद- पेट्रोल 81.09 रुपये आणि 79.53 रुपये लीटर कच्च्या तेलाचे दर कमी होतील असा अंदाज गेल्या रविवारी (06 डिसेंबर 2020) पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, पेट्रोलियम निर्यातक देशांचे संघटन असणाऱ्या Organization of the Petroleum Exporting Countries ने अलीकडेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंधनाचे दर स्थीर होतील. (हे वाचा-OMG! डिसेंबरपर्यंत कार खरेदीवर Renault देत आहे 80 हजारांपर्यंत सूट) त्यांनी असं म्हटलं आहे की, 'ओपेकने दोन दिवस आधीच असा निर्णय घेतला आहे की ते कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज पाच लाख बॅरलने वाढवणार आहेत. याचा आपल्याला फायदा मिळेल आणि आमचा अंदाज असा आहे की दर स्थीर होतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा इथे (भारतात) देखील (इंधनाचे) दर वाढतात.' कसे तपासाल नवे दर? पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही जर इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या