मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC Special Policy: अवघ्या 2582 रुपयांच्या बचतीवर मिळवा तब्बल 1 कोटी रुपये; अशी करा Investment

LIC Special Policy: अवघ्या 2582 रुपयांच्या बचतीवर मिळवा तब्बल 1 कोटी रुपये; अशी करा Investment

ही एलआयसीची अशीच एक जोखीम कमी असलेली योजना आहे.

ही एलआयसीची अशीच एक जोखीम कमी असलेली योजना आहे.

ही एलआयसीची अशीच एक जोखीम कमी असलेली योजना आहे.

  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गानं बचत करत असतात. कमी जोखीम असलेल्या आणि सुरक्षित पर्यांयांमध्ये गुंतवणूक (investment) करण्याकडं सर्वांचाच कल असतो. यामध्ये एलआयसी (LIC special policy) च्या गुंतवणूक योजनांना अनेकांकडून प्राधान्य दिलं जातं. जीवन उमंग (Jeevan Umang) पॉलिसी ही एलआयसीची अशीच एक जोखीम कमी असलेली योजना आहे.

  एलआयसीची जीवन उमंग (LIC Jeevan Umang Policy) ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसींपैकी एक आहे. या पॉलिसीमध्ये विमाधारकाला संपूर्ण आयुष्य संरक्षण मिळतं. विमा संरक्षणाचा लाभ पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत चालू राहतो. या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिना 2582 रुपयांची गुंतवणूक करुन 1 कोटी रुपयांपर्यंत रिटर्न मिळवू शकता. ह्या योजनेचा फायदा कसा होतो? योजनेत गुंतवणूक कशी करावी? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’नं दिलं आहे.

  ही पॉलिसी घेताना विमाधारक विमा रक्कम आणि प्रीमियम पेमेंट टर्म (premium payment term) निवडतो. म्हणजेच किती वर्षांसाठी प्रीमियम (premium) भरावा लागेल आणि किती लाखांचा विमा काढला जाईल, हे आगाऊ ठरवलं जातं. पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटची मुदत संपताच, विमाधारकाला वार्षिक पेन्शन म्हणून विमा रकमेच्या 8 टक्के रक्कम मिळते. ही पेन्शन (pension) संपूर्ण आयुष्यभर मिळते. जेव्हा पॉलिसीधारक वयाची 100 वर्षे पूर्ण करतो तेव्हा पेन्शन थांबते आणि पॉलिसी मॅच्युअर होते.

  हे वाचा - 'या' सरकारी पोर्टलवर करा नोंदणी, होईल बराच फायदा; वाचा सविस्तर

  पॉलिसी कोणासाठी खास आहे?

  ज्यांना पॉलिसी दरम्यान पेन्शन घ्यायची आहे आणि त्यांच्यानंतर कुटुंबाला मोठी रक्कम द्यायची आहे अशा लोकांसाठी ही पॉलिसी खास आहे. ही एक मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला निवडलेल्या पॉलिसी मुदतीपेक्षा कमी दराने प्रीमियम भरावा लागतो. या पॉलिसीमध्ये विमाधारकाला वेस्टेड रिव्हिजनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस मिळतो.

  इतक्या वर्षांसाठी गुंतवणूक

  जीवन उमंग पॉलिसी (Jeevan Umang policy) 15, 20, 25 आणि 30 वर्षासाठी घेता येते. 90 दिवस ते 55 वर्षांपर्यंत वयाच्या लोकांना ही पॉलिसी घेता येते. म्हणजेच, जर एखादे मूल 90 दिवसांचे असेल, तर तुम्ही त्याच्या नावाने जीवन उमंग पॉलिसी खरेदी करू शकता. विमाधारकाचे वय 100 वर्षे झाल्यावर या पॉलिसीची रक्कम मिळते. कमीत कमी 2 लाख रुपयांची पॉलिसी घ्यावी लागते. जास्तीत जास्त विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

  प्रीमियम पेमेंट टर्म

  या पॉलिसीअंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक हप्ते भरता येतात. 2 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. कर्जाची रक्कम पॉलिसी किती वर्षे चालली आहे आणि प्रीमियम भरला आहे यावर अवलंबून आहे. या पॉलिसी अंतर्गत 5 रायडर्स उपलब्ध आहेत, जे अपघात किंवा इतर जोखमीपासून संरक्षण देतात. यामध्ये एक प्रीमियम माफी लाभ रायडर आहे जो आपल्या मुलासाठी घेतला पाहिजे. दुर्दैवाने, प्रीमियम भरणा करणारा जर अकाली जग सोडून गेला, तर मुलाला प्रीमियम माफी रायडरचा लाभ मिळतो आणि त्याचे संपूर्ण प्रीमियम माफ केले जाते. या पॉलिसीमध्ये आयकर कलम 80 सी अंतर्गत कर सूट दिली जाते.

  मॅच्युरिटीवर किती लाभ मिळेल

  या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी (maturity) वर किती लाभ मिळेल हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा 30 वर्षांच्या रमेशने 10 लाख रुपयांची जीवन उमंग पॉलिसी घेतली आहे. त्याने प्रीमियम पेमेंट टर्म म्हणून 30 वर्षे निवडली आहे. त्यानुसार, पॉलिसी कालावधी 70 वर्षे असेल. जर रमेशने मासिक प्रीमियम पर्याय निवड असेल तर त्याला दरमहा 2582 रुपये किंवा वार्षिक प्रीमियम भरल्यास 30 हजार 326 रुपये भरावे लागतील. त्यानुसार रमेशला त्याच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीत 9 लाख 10 हजार 448 रुपये भरावे लागतील. 30 वर्षांनंतर प्रीमियम भरणे बंद होईल. रमेश त्यावेळी 60 वर्षांचा असेल.

  हे वाचा - Fraud Alert: तुम्हालाही येतोय या नंबरहून फोन? बँकेकडून सावधानतेचा इशारा

  जेव्हा रमेश 60 वर्षांचा होईल, तेव्हा त्याला दरवर्षी 80 हजार रुपये किंवा दरमहा 6.5 हजार रुपये पेन्शन मिळेल. रमेश जिवंत असेपर्यंत ही पेन्शन मिळेल. रमेश 100 वर्षांचा झाल्यावर पॉलिसी संपेल. यावेळी रमेशला 10 हजार रुपये विमा रक्कम, 89 लाख 20 हजार रुपये बोनस म्हणून मिळतील. अशा प्रकारे रमेशला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 99 लाख 20 हजार रुपये मिळतील.

  First published:
  top videos

   Tags: LIC, Policy plans