जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Post Office SIP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा मिळतील 5000 रुपये, घरबसल्या करा Invest

Post Office SIP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा मिळतील 5000 रुपये, घरबसल्या करा Invest

Post Office SIP: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा मिळतील 5000 रुपये, घरबसल्या करा Invest

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. यामध्ये, काही काळानंतर, गुंतवणूकदारांना दर महिन्याला मासिक उत्पन्न योजनेची संधी मिळते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 सप्टेंबर : अनेकदा आपल्याला एकदाच एकरकमी गुंतवणूक करुन चांगला परतावा हवा असतो. तुम्हीही अशाच लोकांपैकी एक असाल आणि एखादी चांगली योजना शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आहात. पोस्ट ऑफिसने एक SIP योजना आणली आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये उपलब्ध होतील. यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. यामध्ये, काही काळानंतर, गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न योजनेची (POMIS) संधी मिळते. या योजनेत, तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवून दरमहा तुमचे उत्पन्न मिळवू शकता. 5 वर्षांनी पूर्ण पैसे परत केले जातील या योजनेत तुम्ही जे काही पैसे जमा केले आहेत ते तुम्हाला 5 वर्षांनंतर परत मिळतात. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत सिंगल आणि ज्वॉइंट अकाउंट उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अनेकजण या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्‍वॉइंट अकाउंट पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) मध्ये एका खात्याद्वारे जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकतात. तुम्ही संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. 3 प्रौढ देखील संयुक्त खात्यात सामील होऊ शकतात. परंतु, गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे. वाचा -  प्रॉपर्टीवर जास्तीत-जास्त रिटर्न हवाय? ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या दरमहा पेन्शन मिळेल पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर सध्या वार्षिक 6.6% व्याजदर मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केले असतील तर वार्षिक 6.6 टक्के दराने 1 वर्षासाठी एकूण 59,400 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 4950 रुपये असेल. तुम्ही एकाच खात्यातून 4,50,000 लाख रुपये जमा केल्यास, मासिक व्याज 2475 रुपये असेल. असा घ्या फायदा तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. डॉक्युमेंटमध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. यासोबतच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध आहे. यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन POMIS फॉर्म भरू शकता. तुम्ही ते ऑनलाइनही डाउनलोड करू शकता. फॉर्म भरताना नॉमिनीचे नाव द्यावे लागेल. हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात