जाहिरात
मराठी बातम्या / मनी / प्रॉपर्टीवर जास्तीत-जास्त रिटर्न हवाय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या

प्रॉपर्टीवर जास्तीत-जास्त रिटर्न हवाय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या

प्रॉपर्टीवर जास्तीत-जास्त रिटर्न हवाय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या

मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी हा गुंतवणुकीचा सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो. सध्या भारतातली बहुतेक शहरं बदलाच्या टप्प्यामधून जात आहेत, परिणामी येत्या काळात मालमत्तांचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 सप्टेंबर-   मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी हा गुंतवणुकीचा सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो. सध्या भारतातली बहुतेक शहरं बदलाच्या टप्प्यामधून जात आहेत, परिणामी येत्या काळात मालमत्तांचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अशा शहरांत प्रॉपर्टीमध्‍ये गुंतवणूक करून तुम्ही चांगले रिटर्न मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त रिटर्न मिळवायचे असतील, तर प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठिकाण मालमत्तेचं ठिकाण  ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मालमत्तेचं ठिकाण हेच तिचं मूल्य ठरवते. ठराविक कालावधीत चांगले रिटर्न्स मिळवण्याच्या उद्देशाने तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डेव्हलपमेंट सुरू असलेल्या भागातल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा. आधीपासून प्राइम भागात असलेल्या मालमत्तेच्या तुलनेत गुंतवणुकीची सुरुवातीची किंमतदेखील कमी असेल. सोयी-सुविधा शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्क, शाळा  आणि हॉस्पिटल  यांसारख्या सामान्य सोयी-सुविधा असलेल्या प्रॉपर्टीला चांगली किंमत द्यायला खरेदीदार तयार होतात. म्हणून, नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नेहमी अशा सुविधा उपलब्ध आहेत की नाही हे पाहा. प्रॉपर्टी भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकेल, याची खात्री करा. सार्वजनिक वाहतूक कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी खरेदीदार विचारात घेतलेला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे परिसरात असलेली सार्वजनिक वाहतुकीची (Public Transport) उपलब्धता. उत्तम कनेक्टिव्हिटीचा पर्याय प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याचा इंटरेस्ट वाढवण्यात आणि प्रॉपर्टीचा चांगला मोबदला देण्यास मोठी भूमिका बजावतो. तुम्ही गुंतवणुकीसाठी प्रॉपर्टी शोधत असाल, तर शहराच्या इतर भागांशी, रेल्वे स्टेशन (Railways Station) किंवा विमानतळांशी (Airports) उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले पर्याय निवडा. **(हे वाचा:** मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी; रीसेलवेळी मिळेल मोठा परतावा ) भाड्याची प्रॉपर्टी भाड्याच्या मालमत्तेतली गुंतवणूक डबल बेनिफिटसह येते. यामध्ये प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनमध्ये हळूहळू वाढ होत असताना, या प्रॉपर्टी मालकाला नियमित उत्पन्नाचा स्रोतदेखील देतात. प्रॉपर्टीसाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते आणि जास्त काळ वाट पहिल्यास भांडवल वाढीच्या संधींना उशीर होण्याची शक्यता असते. त्या तुलनेत भाड्याने मिळणाऱ्या प्रॉपर्टी उत्पन्नाची खात्री करून ही समस्या सोडवतात. त्यामुळे भाड्यातून मिळणाऱ्या पैशांतून प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च आणि कर आदी भागवता येतात. प्रॉपर्टी कमर्शिअल हबच्या जवळ असावी कमर्शिअल हब, कॉर्पोरेट ऑफिसेसजवळच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगले रिटर्न मिळू शकतात. तुम्ही कमर्शिअल प्रॉपर्टीत गुंतवणूक केली असेल तर ती कोणत्याही कॉर्पोरेट इन्स्टिट्यूटला भाड्याने देऊ शकता आणि चांगले रिटर्न मिळवू शकता. रेसिडेन्शिअल प्रॉपर्टीजच्या बाबतीत ती त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना भाड्याने देऊ शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात