मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office ची खास योजना, बँकेपेक्षा जास्त आणि पैसेही सुरक्षित; किती महिन्यात होतील पैसे दुप्पट?

Post Office ची खास योजना, बँकेपेक्षा जास्त आणि पैसेही सुरक्षित; किती महिन्यात होतील पैसे दुप्पट?

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेचा विचार करता, यातील बचतीवर सध्या वार्षिक 6.9 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेचा विचार करता, यातील बचतीवर सध्या वार्षिक 6.9 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेचा विचार करता, यातील बचतीवर सध्या वार्षिक 6.9 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 11 ऑगस्ट :  सध्या बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस (Post Office), बॅंकांच्या (Bank) विविध योजना, म्युचुअल फंड (Mutual Fund) आदींचा यात समावेश होतो. तुम्ही जर बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना (Savings Scheme) यासाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे पोस्टाच्या योजनांमध्ये बचत करणं हे अधिक सुरक्षित मानलं जातं. पोस्टाच्या किसान विकास पत्र  हा बचतीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांत ते दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत तुम्ही अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेचा विचार करता, यातील बचतीवर सध्या वार्षिक 6.9 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या योजनेतील व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ पद्धतीने दिलं जातं. पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा सर्वात मोठा झटका, गाशा गुंडाळण्याचे आदेश
किसान विकास पत्र योजनेचं अकाउंट काही अटींच्या अधीन राहून मुदतपूर्ती पूर्वी कधीही बंद करता येतं. सिंगल अकाउंट होल्डर किंवा जॉईंट अकाउंट (Joint Account) असेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर हे अकाउंट बंद करता येतं. याशिवाय, अकाउंटमध्ये रक्कम जमा केल्याच्या तारखेपासून दोन वर्षं सहा महिन्यांनंतर अथवा न्यायालयाच्या आदेशानं अकाउंट बंद केलं जाऊ शकतं.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक प्रौढ आणि तीन प्रौढ व्यक्ती संयुक्तपणे जॉईंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेंतर्गत अल्पवयीन किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्ती त्यांच्या पालकांमार्फत अकाउंट उघडू शकतात. Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…
किसान विकास पत्र या लघु बचत योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागते. या योजनेत बचतीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेतून जमा केलेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीनुसार मॅच्युअर होते. एकूणच पोस्टाची किसान विकास पत्र ही योजना बचतीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी आहे.
First published:

Tags: Investment, Money, Post office

पुढील बातम्या