मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

Credit Card Tips: तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल आणि पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा अधिक वापर करत असाल तर काही विशेष खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 10 ऑगस्ट : तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल आणि पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा अधिक वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आपणही त्याला बळी पडू नये म्हणून काही विशेष खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं जोखीम टाळण्यासाठी या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. कॉन्टॅक्टलेस व्यवहार टाळा- आजकाल वाढत्या डिजिटायझेशनमुळे बहुतेक क्रेडिट कार्ड कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची सुविधा देत आहेत. पण ती तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. वास्तविक, हे वैशिष्ट्य पिन प्रविष्ट न करता पेमेंट सक्षम करते. पण चुकून तुमचं कार्ड हरवलं आणि चुकीच्या हातात पडलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे वैशिष्ट्य बंद करणे शहाणपणाचे आहे. 2. व्यवहार मर्यादा सेट करा (Set Transaction Limit)- क्रेडिट कार्ड धारक त्याच्या गरजेनुसार पॉइंट ऑफ सेल (POS) वर व्यवहार मर्यादा सेट करू शकतो. या अंतर्गत, जर तुम्ही सामान्यतः 5,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी कार्ड वापरत नसाल, तर तुम्ही तेवढीच ट्रांजेक्शन मर्यादा सेट करू शकता. असं केल्यानं, तुमचं क्रेडिट कार्ड एकाच वेळी या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू शकणार नाही. हेही  वाचा-  India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही 3. आंतरराष्ट्रीय व्यवहार  (International Transaction) बंद करा- जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि परदेशात सहलीला जात नसाल, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवण्याचा पर्याय निवडू शकता. गरज भासल्यास तो पुन्हा सुरूही करता येईल. तसेच कोणतेही आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन व्यवहार मर्यादित करणं किंवा निष्क्रिय करणं अधिक चांगलं होईल, कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहार साधारणपणे OTP शिवाय पूर्ण होतात. 4. कार्ड मर्यादा सेट करणं आवश्यक- अनेकदा असं दिसून येतं की क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी ग्राहकांना संदेश पाठवतात आणि वापरकर्ते ती वाढवत राहतात. त्यांच्या गरजा कमी असल्या तरीही ते असं करतात. पण तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची मर्यादा ठेवणंच शहाणपणाचं ठरतं. म्हणजेच जेव्हा गरजा कमी असतील, तेव्हा मर्यादा कमी करा, यामुळं निश्चित रकमेपेक्षा जास्त क्रियाकलाप आपोआप ब्लॉक होईल. गरज भासल्यास मर्यादा वाढवता येऊ शकते. 5. रोख रक्कम काढण्य़ासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका- बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंतची रोकड काढण्याची सुविधाही क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु तसं करणे टाळलं पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास उत्तम. कारण ज्या दिवशी तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढता त्या दिवशी त्यावर व्याजही जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत, जर फार महत्वाचं नसेल, तर क्रेडिट कार्डमधून पैसे काढणं टाळायला हवं.
First published:

Tags: Credit card, Money fraud

पुढील बातम्या