नवी दिल्ली, 11 एप्रिल : पोस्ट ऑफिसमधील (Post Office) योजनांमध्ये अनेक जीवन विमा योजना आहेत, त्यापैकी एक ग्राम सुमंगल रुरल पोस्टल लाईफ इन्शोरन्स स्किम (Gram Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) आहे. ही एक एंडोमेंट स्कीम (endowment) आहे, जी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना मनीबॅकसह इन्शोरन्स कव्हरही देते. या स्किमअंतर्गत दोन प्रकारचे प्लॅन येतात.
या योजनेचा आणखी एक फायदा असा की, जर दररोज केवळ 95 रुपयांच्या हिशोबाने यात गुंतवणूक केल्यास, या स्किमच्या शेवटपर्यंत 14 लाख रुपये मिळवता येऊ शकतात. रुरल पोस्टल लाईफ इन्शोरन्स स्किमची सुरुवात 1995 मध्ये झाली होती. या स्किमअंतर्गत पोस्ट ऑफिस 6 वेगवेगळ्या विमा योजना देते. त्यापैकीच एक ही ग्राम सुमंगल आहे.
काय आहे ग्राम सुमंगल स्किम -
ही पॉलिसी अशा लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे, ज्यांना वेळोवेळी पैशांची गरज पडते. मनीबॅक इन्शोरन्स पॉलिसी ग्राम सुमंगल योजनेत अधिकतर 10 लाख रुपयांचा सम एश्योर्ड मिळतो. पॉलिसी घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू पॉलिसी अवधी काळात न झाल्यास, त्याला मनीबॅकचा फायदा मिळतो. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सम एश्योर्डसह बोनस रक्कमही दिली जाते.
पॉलिसी कोण घेऊ शकतं?
यात 15 वर्ष आणि 20 वर्ष सामिल आहे. या पॉलिसीसाठी कमीत-कमी वय 19 वर्ष असावं लागतं. अधिकतर 45 वर्षीय व्यक्ती 15 वर्षांच्या अवधीसाठी या स्किमचा फायदा घेऊ शकतो. 20 वर्षासाठी ही पॉलिसी अधिकतर 40 वर्षीय व्यक्ती घेऊ शकतो.
मनीबॅक नियम -
15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 6 वर्ष, 9 वर्ष, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20-20 टक्के मनीबॅक मिळते. तर मॅच्युरिटीवर बोनससह बाकी 40 टक्के पैसा दिला जाईल. अशाप्रकारे, 20 वर्षाच्या पॉलिसीमध्ये 8 वर्ष, 12 वर्ष आणि 16 वर्षांच्या अवधीवर 20-20 टक्के पैसे मिळतात. बाकी 40 टक्के पैसे बोनससह मॅच्युरिटीवर दिले जातात.
दररोज 95 रुपये प्रीमियम -
जर 25 वर्षीय व्यक्ती 7 लाख रुपयांच्या सम एश्योर्डसह ही पॉलिसी 20 वर्षासाठी घेतल्यास, त्याला प्रत्येक महिन्याला 2853 रुपये प्रीमियम पडेल. म्हणजेच दररोजच्या हिशोबाने जवळपास 95 रुपये. तिमाही प्रीमियम 8449 रुपये, सहामाही प्रीमियम 16715 रुपये आणि वार्षिक प्रीमियम 31735 रुपये असेल.
असे मिळतील 14 लाख -
पॉलिसीमध्ये 8व्या, 12व्या आणि 16 व्या वर्षात 20-20 टक्क्यांच्या हिशोबाने 1.4-1.4 लाख रुपये मिळतील. शेवटी 20व्या वर्षात 2.8 लाख रुपये सम एश्योर्ड रुपात मिळतील.
प्रति हजार वार्षिक बोनस 48 रुपये आहे, 7 लाख रुपयांच्या सम एश्योर्डवर वार्षिक बोनस 33600 रुपये. म्हणजेच पूर्ण पॉलिसीच्या अवधीत 20 वर्षात 6.72 लाख रुपये इतका बोनस झाला. 20 वर्षात एकूण 13.72 लाख रुपयांचा फायदा होईल. यात मनीबॅक 4.2 लाख रुपये आधीच मिळतील आणि मॅच्युरिटीवर एकत्र 9.52 लाख रुपये दिले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.