नवी दिल्ली,10 मे : ‘नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास अमित शहा होतील गृहमंत्री होतील. अमित शहा ज्या देशाचे गृहमंत्री असतील त्या देशाचं काय होईल हे विचार करून मतदान करा,’ असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिल्लीतील 7 जागांसाठी मतदान होणं बाकी आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशवासियों, वोट देते वक़्त सोचना। अगर मोदी जी दोबारा आ गए तो अमित शाह गृह मंत्री होंगे। जिस देश का गृह मंत्री अमित शाह हो, उस देश का क्या होगा, ये सोच के वोट डालना। https://t.co/ws2ZCA7hjv
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 10, 2019
दिल्लीच्या रणांगणात गौतम गंभीरही वादात आपच्या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप केले. गौतम गंभीर यांचे समर्थक काही पत्रकं वाटत आहेत. या पत्रकांमध्ये माझ्या जातीबाबत, माझ्या आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत असा आरोप आतिशी यांनी केला आहे. हे सांगत असताना आतिशी मार्लेना यांना पत्रकार परिषदेत रडूही कोसळले. जी पत्रकं माझ्याविरोधात वाटली जात आहेत ती वाचणंही लज्जास्पद आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘ही पत्रकं मी वाटली, हे जर सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन. मात्र आतिशी यांनी ते सिद्ध करुन दाखवावं. 23 मे पर्यंत सिद्ध करू शकल्या नाहीत तर केजरीवाल यांनी राजकारणाचा राजीनामा देतील का?’ असा सवाल गौतम गंभीरनं केला आहे. VIDEO: …तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम ‘गंभीर’ आव्हान