नवी दिल्ली, 11 जानेवारी : छोट्या बचत योजनांसाठी लोकांचा पोस्टाच्या बचत योजनांवर भरवसा असतो. पण आता मात्र पोस्ट ऑफिसच्या (Small Saving Schemes)योजनांचे काही नियम बदलले आहेत. एका आर्थिक वर्षात तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा पैसे काढलेत तर त्यासाठी तुम्हाला TDS द्यावा लागण्याची शक्यता आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, केंद्र सरकारने एक तरतूद केली आहे. तुम्ही जर 1 सप्टेंबर 2019 च्या नंतर तुमच्या खात्यातून 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्यासाठी तुम्हाला 2 टक्के TDS द्यावा लागेल. असा कापला जाईल TDS केंद्र सरकारने इनकम टॅक्स अॅक्टमध्ये बदल केला आहे. 2019 - 2020 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा रक्कम काढायची असेल तर 2 टक्के TDS कापणं सक्तीचं करण्यात आलं आहे. हा नियम 1 सप्टेंबर 2019 पासून लागू झालाय. (हेही वाचा : मंदीचा फटका! OYO रूम्स करणार 1 हजार कर्मचाऱ्यांची कपात) CBDT ने दिलं स्पष्टीकरण CBDT ने याआधीच यावर स्पष्टीकरण दिलंय. 1 सप्टेंबर 2019 नंतर तुमच्या खात्यातून 1 कोटी रुपये काढलेत तर त्यासाठी तुम्हाला 2 टक्के TDS द्यावा लागेल. ही गोष्टी महत्त्वाची हा नियम पूर्ण आर्थिक वर्षासाठी लागू आहे. तुम्ही जर 31 ऑगस्ट 2019 च्या आधी 1 कोटी रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम काढली असेल तर 1 सप्टेंबरच्या नंतर पैसे काढण्याबद्दल तुम्हाला 2 टक्के TDS द्यावा लागेल. सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्टाच्या बचत योजना खूपच फायदेशीर आहेत. हा बदललेला नियम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैेसे काढले तरच लागू होतो हेही लक्षात घ्यायला हवं. (हेही वाचा : आता पैसे भरण्यासाठी जावं लागणार नाही बँकेत, असा असेल हा नवा कॅश काउंटर) =================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







