जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LPG Cylinder: सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता, सरकारने उचललं मोठं पाऊल

LPG Cylinder: सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता, सरकारने उचललं मोठं पाऊल

LPG Cylinder: सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता, सरकारने उचललं मोठं पाऊल

पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने एक आदेश जारी करून नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारीख यांच्या नेतृत्वाखाली ही पुनरावलोकन समिती स्थापन केली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 7 सप्टेंबर : देशभरात घरगुती सिलेंडरच्या किमती हजारांच्या पलिकडे गेल्या आहे. त्यामुळे सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. तुम्हीही दर महिन्याला गॅस सिलेंडर घेत असाल आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्याच्या सूत्राचा आढावा घेण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने एक आदेश जारी करून नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारीख यांच्या नेतृत्वाखाली ही पुनरावलोकन समिती स्थापन केली आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सरकारने स्थापन केलेली ही समिती ग्राहकांना गॅसच्या वाजवी दराबाबत सूचना देणार आहे. शहरातील गॅस वितरण, सार्वजनिक गॅस कंपनी गेल इंडिया लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि खत मंत्रालयाशी संबंधित खाजगी कंपन्या प्रत्येकी एक प्रतिनिधी देखील या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 2014 मध्ये, सरकारने देशांतर्गत उत्पादित गॅसची किंमत निर्धारित करण्यासाठी एक सूत्र शोधण्यासाठी गॅस वापरणाऱ्या देशांच्या गॅसच्या किमती वापरल्या. पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमचे पैसे करेल डबल, कुठे आणि कशी कराल गुंतवणूक? रशिया-युक्रेन युद्धानंतर किंमती झपाट्याने वाढल्या या सूत्रानुसार, मार्च 2022 पर्यंत गॅसच्या किमती उत्पादन खर्चाच्या कितीतरी पटीने कमी होत्या. मात्र युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत हा दर झपाट्याने वाढला आहे. जुन्या गॅस फील्डमधील गॅसची किंमत एप्रिलपासून दुप्पट होऊन 6.1 डॉलर प्रति युनिट (MMBTU) झाली आहे आणि पुढील महिन्यापर्यंत प्रति युनिट 9 डॉलरच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. टायपिंग मिस्टेक समोर येताच या शेयरमध्ये उसळी; एका दिवसात 20 टक्क्यांची तेजी मंत्रालयाने या समितीला ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या गॅसची वाजवी किंमत सुचवण्यास सांगितले आहे. खते बनवण्याव्यतिरिक्त, गॅसचा वापर वीज निर्मितीसाठी आणि सीएनजी आणि एलपीजी म्हणून देखील केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gas , LPG Price
  • First Published :
जाहिरात
जाहिरात