मुंबई, 7 सप्टेंबर : सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. तेही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल सुरक्षेची चिंताच नसते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर दुप्पट पैसे मिळतील.
आम्ही किसान विकास पत्र (KVP) बद्दल बोलत आहोत. तुम्ही या योजनेत 1000 ने गुंतवणूक सुरू करू शकता. कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. त्याचा मॅच्यरिटी कालावधी 124 महिने (10 वर्षे 4 महिने) आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे जेणेकरून त्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करता येईल. परंतु 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा लॉक-इन कालावधी देखील 2.5 वर्षांचा आहे.
टायपिंग मिस्टेक समोर येताच या शेयरमध्ये उसळी; एका दिवसात 20 टक्क्यांची तेजी
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
यामध्ये तुम्हाला तुमची गुंतवणूक 124 महिने टिकवून ठेवावी लागेल, त्यामुळे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. येथे व्याजदर दर तिमाहीत निश्चित केले जातात. सध्या या योजनेवर सरकार 6.9 टक्के दराने व्याज देत आहे. जूनमध्ये त्याच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. रेपो दरात झालेली वाढ पाहता आता त्याचा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.
पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, तुम्ही ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून देखील खरेदी करू शकता. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते, त्यामुळे तुमचे पैसे मॅच्युरिटीवर दुप्पट होतात. जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर 124 महिन्यांनंतर ही रक्कम दुप्पट होऊन 10 लाख रुपये होईल.
पर्सनल लोनचे तोटे समजून घ्या; विचारपूर्वक लोन घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो
संयुक्त खाते सुविधा देखील उपलब्ध
तुम्ही किसान विकास पत्र कुणासोबतही उघडू शकता. यामध्ये संयुक्त खात्याचा पर्यायही सरकार देते. जरी हे खाते प्रौढांसाठी सुरू केले गेले असले तरी अल्पवयीन 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु खाते केवळ प्रौढ व्यक्तीनेच सांभाळावे लागेल. ट्रस्ट देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Post office