मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PNB ग्राहकांना या स्कीममधून मिळेल 15 लाखांचा फायदा, वाचा काय आहे योजना?

PNB ग्राहकांना या स्कीममधून मिळेल 15 लाखांचा फायदा, वाचा काय आहे योजना?

अनेकदा छोट्या बचत योजनांमध्ये (Investment on Small Saving Scheme) गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणूक करून चांगली फायदा मिळवता येतो. तुम्हाला भविष्यातील पैशाचीही तरतूद या योजनांच्या माध्यमातून करता येते.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: अनेकदा छोट्या बचत योजनांमध्ये (Investment on Small Saving Scheme) गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणूक करून चांगली फायदा मिळवता येतो. तुम्हाला भविष्यातील पैशाचीही तरतूद या योजनांच्या माध्यमातून करता येते. अशाप्रकारेच तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी  सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana-SSY) एक फायद्याची योजना आहे. पंजाब नॅशनल बँकेतही ही योजना देऊ केली जाते. बँकेने वेळोवेळी याबाबत माहितीही दिली आहे. तुम्हाला पालक किंवा गार्डियन म्हणून तुमच्या एका मुलीच्या नावे एकच SSY खातं उघडता येईल. किती करावं लागेल डिपॉझिट? यामध्ये तुम्हाला किमान ठेव 250 रुपये करावी लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण ते इतर काही गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चापासून मोठा आराम मिळेल. सुकन्या समृद्ध योजनेसाठी सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जाते, या व्याजावर आयकर सवलत देखील आहे. वाचा-25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट मॅच्युरिटीवर मिळतील 15 लाखांपेक्षा जास्त तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये गुंतवले म्हणजेच 36000 रुपये वार्षिक गुंतवणूक केली तर, 14 वर्षांनंतर तुम्हाला 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळतील.  21 वर्षानंतर मॅच्युरिटीनंतर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. कुठे उघडता येईल खातं पंजाब नॅशनल बँकेव्यतिरिक्त इतरही काही बँका आहेत ज्या तुम्हाला या योजनेत खातं उघडण्याची सुविधा देतात. या योजनेचे खाते तुम्ही कोणतेही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शिअल बँकेच्या अधिकृत शाखेमध्ये उघडू शकता. कोणत्या कागदपत्रांची भासेल आवश्यकता? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचा जन्म दाखला फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सादर करावा लागेल. याशिवाय मुलीचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कुठे राहत आहेत याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल) सादर करावा लागेल. वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका, ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांपेक्षा जास्त वधारले भाव दरम्यान या योजनेमध्ये दरवर्षी किमान 250 रुपये जमा केले जात नाहीत, तर खाते बंद केले जाईल. हे खाते पुन्हा सुरू करता येईल मात्र त्यासाठी दंड भरावा लागेल. ज्या वर्षी तुम्ही पैसे भरले नाही आहेत त्या वर्षासाठी आवश्यक किमान रकमेसह वार्षिक 50 रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल. त्यानंतर तुमचे खाते पुन्हा सुरू होईल. खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांपर्यंत रिअॅक्टिव्हेशन करता येऊ शकते.
First published:

Tags: Investment, Savings and investments

पुढील बातम्या