जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 'या' बँकेनं ग्राहकांसाठी सुरू केलीय खास सेवा, मुदतीपेक्षा जास्त रक्कम वापरण्याची संधी

'या' बँकेनं ग्राहकांसाठी सुरू केलीय खास सेवा, मुदतीपेक्षा जास्त रक्कम वापरण्याची संधी

ईएमआय बाऊन्स होऊ नये म्हणून काय कराल

ईएमआय बाऊन्स होऊ नये म्हणून काय कराल

ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचं कर्ज आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये असलेल्या शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता येतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (PNB) तुमचं अकाउंट असल्यास, तुम्ही मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट ( FD) वर ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज भासणार नाही. तर, तुम्ही आता घरबसल्या एफडीवर ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकता. यासाठी बँक ग्राहक बँकेच्या ‘पीएनबी वन’ अ‍ॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करू शकतात. ओव्हरड्राफ्टमध्ये जेवढ्या मुदतीसाठी पैसे घेतले आहेत, तेवढ्या मुदतीचं व्याज द्यावं लागतं. पण तुम्हाला या व्याजदरात काही प्रमाणात सवलतसुद्धा मिळणार आहे. एवढचं नाही, तर बँकेनं पीएनबी वनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज केल्यास व्याजावर 0.25 टक्के सूट देण्याची घोषणाही केली आहे. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? तुम्हाला ओव्हरड्राफ्टबद्दल माहिती नसेल, तर काळजी करू नका. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचं कर्ज आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये असलेल्या शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता येतात. हे अतिरिक्त पैसे ठराविक मुदतीत परत करावे लागतात, आणि त्यावर व्याजही लागतं; पण या व्याजाची टक्केवारी ही कमी असते. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे किती पैसे घेता येतील? बँका मुदत ठेवीच्या (FD) रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट घेण्यास परवानगी देतात. तसंच ओव्हरड्राफ्ट सुविधेवरील व्याजदर तुमच्या बँकेतील मुदत ठेवीवर मिळालेल्या व्याजापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला मुदत ठेवीवर 6 टक्के वार्षिक रिटर्न मिळत असल्यास, ओव्हरड्राफ्टसाठी 7 ते 8 टक्के वार्षिक व्याज आकारलं जाईल. कॅटेगरीनुसार ओव्हरड्राफ्टची रक्कम निश्चित पीएनबीच्या माय सॅलरी अकाउंटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ओव्हरड्राफ्ट मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सिल्व्हर कॅटेगरीसाठी 50000 रुपये, गोल्डसाठी 150000 रुपये, प्रीमिअमसाठी 225000 रुपये आणि प्लॅटिनम कॅटेगरीसाठी 300,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा समाविष्ट आहे. यासोबतच स्वीपची सुविधाही मिळते. Business Idea: अत्यंत कमी भांडवलात सुरू करा बिझनेस; दर महिन्याला लाखोंमध्ये होईल कमाई!

    News18लोकमत
    News18लोकमत

    आर्थिक संकटाच्या वेळी, आपण अनेकदा असे पर्याय शोधतो की जिथे आपल्याला सहज पैसे मिळू शकतील, आणि कमी व्याजदेखील द्यावं लागेल. बऱ्याचदा त्यासाठी आपण पर्सनल लोन करण्यास प्राधान्य देतो. कारण पर्सनल लोन लवकर मिळते, त्यामुळेच अनेकांची पसंती त्याला असते. परंतु, पर्सनल लोनवर आकारला जाणारा व्याजदर हा खूपच जास्त असतो. अशावेळी ओव्हरड्राफ्ट या बँकेच्या सुविधेचा लाभ घेणं जास्त फायद्याचं ठरतं. यामुळे पैशाची गरज पूर्ण होतेच, शिवाय कमी व्याजदराने पैसे मिळतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात