जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Business Idea: अत्यंत कमी भांडवलात सुरू करा बिझनेस; दर महिन्याला लाखोंमध्ये होईल कमाई!

Business Idea: अत्यंत कमी भांडवलात सुरू करा बिझनेस; दर महिन्याला लाखोंमध्ये होईल कमाई!

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

अनेक गरजू व्यक्तींसाठी हा व्यवसाय वरदान ठरू शकतो. एकापेक्षा अधिक वाहनं असल्यास मनुष्यबळ व्यवस्थापन (Manpower Management) जमलं तर अशक्य काहीच नाही.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : तुम्हाला तुमच्या कामात तोचतोचपणा जाणवत असेल आणि काही तरी नवीन करण्याची खूप इच्छा असेल, तर मग हे नक्की वाचा. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, पण कोणता ते ठरवणं अवघड जात असेल, तर तुम्हाला उत्तम कमाईचा एक चांगला पर्याय आम्ही सांगू इच्छितो. खरं तर हा व्यवसाय तसा पूर्वीपासून सुरू आहेच. परंतु, सध्या या व्यवसायाला सुगीचे दिवस आलेत. हा व्यवसाय दुसरा-तिसरा कोणता नसून, ट्रान्सपोर्टचा आहे. अतिशय कमी भांडवलात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करता येतो. कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवणं यात शक्य आहे. हा व्यवसाय गावाच्या ठिकाणी किंवा शहरात असा कुठेही सुरू करता येऊ शकतो. हल्ली या व्यवसायाची गरज वाढली आहे. भारतासारख्या मोठ्या देशात ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाचं भविष्य उज्वल आहे. त्याबद्दल थोडं जाणून घेऊ या. फक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया या व्यवसायाला मिळतेय गती भारतात प्रवास करणार्‍यांची संख्या खूप आहे. विविध देशातून पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात. तसंच, देशांतर्गत पर्यटकांची संख्याही मोठी असते. अशा वेळी त्यांच्याजवळ सामान खूप असतं. त्यांना ट्रान्सपोर्टची आवश्यकता असतेच. यामुळे पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना, त्यांचं सामान वाहून नेण्यासाठी कारसारख्या वाहनांची गरज लागते. अनेक जण घर शिफ्ट करतात. तेव्हाही टेम्पो किंवा ट्रकसारख्या वाहनांची गरज लागते. अशा वेळी ट्रान्सपोर्ट व्यवसायाची गरज लागते. अ‍ॅप्लिकेशनद्वारे टॅक्सी सर्व्हिस सध्या टॅक्सी सर्व्हिसचा व्यवसाय तेजीत आहे. कुठेही बाहेर जायचं असलं की, शहरातल्या व्यक्ती पहिल्यांदा स्मार्टफोनद्वारे ओला किंवा उबरची टॅक्सी बुक करतात. त्यामुळे कमी वेळात वाहन उपलब्ध होतं आणि त्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो. तुम्ही स्वत: कारचे मालक असाल, तर तुम्ही तुमची वाहनं भाडेतत्त्वावर ट्रान्सपोर्ट कंपन्यांना देऊ शकता. शक्य असल्यास तुम्ही एकापेक्षा अधिक कार्सही या कंपन्यांकडे कराराद्वारे चालवायला देता येतात. कार भाड्यावरही मिळू शकते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा असेल तर कार भाडेतत्त्वावरही घेता येते. अशाप्रकारे कार भाड्यावर चालवायला घेऊन कुठल्याही पर्यटनाच्या ठिकाणी किंवा शहरात त्यावर चांगले पैसे कमावता येऊ शकतात. अनेक जण व्यवसायासाठी या पद्धतीचाही अवलंब करतात. यासाठी तुमच्याकडे कार चालवण्याचा परवाना आणि कारची सगळी कागदपत्रं असणं मात्र गरजेचं आहे. अनेक गरजू व्यक्तींसाठी हा व्यवसाय वरदान ठरू शकतो. एकापेक्षा अधिक वाहनं असल्यास मनुष्यबळ व्यवस्थापन (Manpower Management) जमलं तर अशक्य काहीच नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात