मराठी बातम्या /बातम्या /मनी /पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी खास सुविधा; डेबिट कार्ड नसेल तरी विनाअडथळा होतील अनेक कामं

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी खास सुविधा; डेबिट कार्ड नसेल तरी विनाअडथळा होतील अनेक कामं

तुम्ही PNB One अॅपद्वारे व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार करू शकता. व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार करणे अतिशय सोपं आहे. यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये PNB One अॅप असणे आवश्यक आहे, त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.

मुंबई, 10 मे : देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) PNB One या अॅपद्वारे तुमचा शॉपिंगचा अनुभव सुलभ केला आहे. तुमचे डेबिट कार्ड कुठे हरवले असेल किंवा गरजेच्या वेळी तुमच्यासोबत नसेल, तर तुम्ही PNB One अॅपद्वारे व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार करू शकता. व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार करणे अतिशय सोपं आहे. यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये PNB One अॅप असणे आवश्यक आहे, त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.

डिजिटल डेबिट कार्ड कसे तयार करावे?

>> सर्वप्रथम PNB One अॅपवर लॉग इन करा.

>> त्यानंतर होम स्क्रीनवर डेबिट कार्ड निवडा.

>> यानंतर तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्ड स्क्रीनवर नेले जाईल जिथे तुम्हाला 'Request Virtual Card' हा पर्याय निवडावा लागेल.

>> यानंतर, नवीन स्क्रीनवर, तुमचा खाते क्रमांक आणि डेबिट कार्ड प्रकार निवडा.

>> ते प्री कन्फर्मेशन स्क्रीनवर सबमिट करा.

>> यानंतर, व्हर्च्युअल कार्ड अॅक्टिव्ह करा स्क्रीनवर तुमची संमती द्या आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकून व्हर्च्युअल डेबिट कार्ड अॅक्टिव्ह करा.

>> तुमचे व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार आहे जे तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी वापरू शकता.

Home Loan महागल्याने बजेट कोलमडलं? 'या' टिप्स फॉलो करुन तुम्ही EMI कमी करु शकता

PNB One चे इतर फायदे

या अॅपद्वारे तुम्ही मोबाईल, वीज, लँडलाइनसह अनेक प्रकारची बिले भरू शकता. येथे तुम्ही चेकची पॉझिटिव्ह पे सिस्टमसह पडताळणी करू शकता. याशिवाय पीएनबी वनद्वारे ऑनलाइन डिमॅट खाते उघडणे, इतर कोणत्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, सुकन्या समृद्धी योजनेसारख्या सरकारी योजनांमध्ये पैसे टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार

PNB One वर नोंदणी कशी करावी?

आधी अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करा. त्यानंतर New User च्या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल आणि खाते क्रमांक टाका. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल जो तुम्ही अॅपमध्ये टाकाल. यानंतर खात्याशी लिंक केलेला आधार आणि पॅन क्रमांक टाका. लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. आता तुम्ही अॅप वापरू शकता.

First published:

Tags: Online shopping, Pnb, Pnb bank