Home /News /money /

Home Loan महागल्याने बजेट कोलमडलं? 'या' टिप्स फॉलो करुन तुम्ही EMI कमी करु शकता

Home Loan महागल्याने बजेट कोलमडलं? 'या' टिप्स फॉलो करुन तुम्ही EMI कमी करु शकता

RBI ने रेपो रेट वाढवल्याने गृहकर्ज, वाहन कर्जाच्या मासिक हप्त्यावर (EMI) परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत, महागड्या कर्जाच्या जमान्यात तुमचा ईएमआय कमी करायचा असेल, तर अशा 5 टिप्स आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात.

    मुंबई, 10 मे : वाढत्या महागाईवर (Inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांकडून व्याजदरात वाढ (Home Loan Interest Rates) करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला. आरबीआयच्या या घोषणेनंतर बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आणि आयडीबीआयसह अनेक बँकांनी कर्जे महाग करण्याची घोषणा केली. ज्याचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्जाच्या मासिक हप्त्यावर (EMI) होईल. अशा परिस्थितीत, महागड्या कर्जाच्या जमान्यात तुमचा ईएमआय कमी करायचा असेल, तर अशा 5 टिप्स आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात. झी बिझनेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्री-पेमेंट कर्जाचे EMI कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शक्य तितकं प्री-पेमेंट करणे. जर तुमच्याकडे तुमच्या खर्चाव्यतिरिक्त बचत असेल किंवा तुम्हाला कुठून तरी मोठा निधी मिळत असेल, तर तुम्ही तुमच्या कर्जाचा ईएमआय प्रीपेमेंटद्वारे कमी करू शकता. खरं तर, जेव्हा तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्हा ती रक्कम थेट मूळ रकमेमध्ये (Principal Amount) कमी होत असते. अशा प्रकारे तुमचा मासिक हप्ता देखील कमी होतो. कर्जाचा कालावधी वाढवा अनेक वेळा असे घडते की होम लोन ईएमआयमुळे मासिक खर्चावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न किंवा बचत मिळत नसेल, तर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवून EMI कमी करू शकता. पण, यात एक तोटा असेल की तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. कर्ज घेताना व्याजदराची तुलना करा गृहकर्ज बँक निवडताना नेहमी व्याजदरांची तुलना करा. चांगली डील मिळेल तिथून कर्ज घ्या. बर्‍याच वेळा असे होते की तुम्ही बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे, परंतु इतर बँकेचा व्याजदर कमी आहे, त्यामुळे तुम्ही कर्ज ट्रान्सफर करू शकता. नेहमी सर्वोत्तम डील मिळवा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा कर्ज ट्रान्सफर करा. चांगल्या व्याजदराबाबत बँकेशी चर्चा करा बँका कधीकधी ग्राहकांना त्यांच्या चांगल्या रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड आणि सिबिल स्कोअरसह व्याजदरांमध्ये अतिरिक्त सवलत देतात. तुमचा रेकॉर्ड चांगला असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेशी बोलून गृहकर्जाचा व्याजदर शक्य तितका कमी मिळवू शकता. यामुळे तुमचा EMI कमी होईल. डाऊन पेमेंट जास्त करा गृहकर्ज घेताना, डाउन पेमेंट शक्य तितक्या जास्त करण्याचा प्रयत्न करा. याचे कारण म्हणजे 1-2 लाख रुपयांचे जास्त डाउन पेमेंट देखील तुमचा EMI 2-3 हजार रुपयांनी कमी करू शकते. याशिवाय व्याजाचीही बचत होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Home Loan, Investment, Money

    पुढील बातम्या