मराठी बातम्या /बातम्या /मनी /Whatsapp Updates : 'या' सरकारी बँकेकडून Whatsapp सर्व्हिस लाँच, पाहा तुम्हाला कसा होणार फायदा

Whatsapp Updates : 'या' सरकारी बँकेकडून Whatsapp सर्व्हिस लाँच, पाहा तुम्हाला कसा होणार फायदा

Whatsapp

Whatsapp

ही सेवा बँकेच्या सुट्ट्या असेल तेव्हाही ग्राहकांना वापरता येणार आहे. अॅण्ड्रॉइड आणि ios या दोन्ही मोबाईलमध्ये ही सेवा वापरता येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सरकारने स्वामित्व स्वीकारलेल्या एका बँकेनं Whatsapp बँक सेवा सुरु केली आहे. या नव्या सुविधेचा लाभ ग्राहकांसोबत इतरही ग्राहक घेऊ शकतात. जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना देखील या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा बँकेच्या सुट्ट्या असेल तेव्हाही ग्राहकांना वापरता येणार आहे. अॅण्ड्रॉइड आणि ios या दोन्ही मोबाईलमध्ये ही सेवा वापरता येणार आहे.

कोणत्या बँकेनं सुरू केलीय सेवा

पंजाब नॅशनल बँक असं या बँकेचं नाव आहे. ज्यांनी पहिल्यांदाच Whatsapp सेवा सुरू केली आहे. बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, WhatsApp वर बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी, ग्राहकांनी अधिकृत PNB WhatsApp क्रमांक 919264092640 नंबर सेव्ह करणं आवश्यक आहे.

कसं सुरू करायचं?

या नंबरवर हाय/हॅलो पाठवून संभाषण सुरू करावे लागेल. यानंतर, तुम्ही बँकेशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता. निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांनी संभाषण सुरू करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवरील पीएनबीच्या प्रोफाईल नावावर 'ग्रीन टिक' आहे की नाही ते तपासणं बंधनकारक आहे.

WhatsApp बँकिंगची मिळणार सुविधा

तुम्हाला यावर तुमच्या खात्यावरील रक्कम, शेवटचे ६ ट्रान्झॅक्शन, टॉप चेक, रिक्वेस्ट चेक बुकसारख्या नॉन फायनांशियल सेवा उपलब्ध असणार आहेत. तुम्हाला बँकेशी किंवा खात्याशी संबंधित माहिती मिळू शकते. ऑनलाइन खातं उघडणं, बँकेत पैसे जमा करणं, लोन, डिजिटल खातं पाहाणं, एटीएमसारख्या अनेक सुविधांची माहिती तुम्हाला इथे मिळू शकते.

PNB ने वाढवलं व्याजदर

PNB बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आधी व्याजदर ७.६५ टक्के होता आता तो ७.७० टक्के असणार आहे. आरबीआयने व्याजदरात वाढ केल्यानं बँकेनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे EMI आणि कर्ज महाग झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Pnb bank, Whatsapp, Whatsapp alert, Whatsapp messages