व्हॉट्सअॅपनं काही युजर्ससाठी ऑनलाइन स्टेटस लपवण्यासाठी एक फीचर आणलं आहे. मेटाच्या मार्क झुकरबर्गनं गेल्या महिन्यात 3 प्रायव्हसी फीचर्सची घोषणा केली, त्यापैकी एक 'ऑनलाइन प्रेजेन्स’ होतं. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळं युजर्सना ते ऑनलाइन असल्याचं कोण पाहू शकतं हे ठरवण्याचा अधिकार असेल. म्हणजेच आता वापरकर्ते त्यांना कोण ऑनलाइन पाहू शकतील अशा वेगवेगळ्या लोकांसाठी सेट करू शकतील.
सध्या हे फीचर कंपनीनं फक्त काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केलं आहे. काही बीटा परीक्षकांनी WhatsApp बीटा अँड्रॉइड 2.22.20.9 अपडेट इन्स्टॉल केलं आहे आणि ते त्यांची ऑनलाइन स्थिती सहजतेनं लपवू शकतात. याशिवाय iOS युजर्सनाही हे फीचर पाहायला मिळत आहे.
WABetaInfo ने त्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, जेणेकरून हे फीचर कसं दिसतं ते कळेल. यासाठी वापरकर्त्यांना 'लास्ट सीन' विभागात जावं लागेल.
येथे वापरकर्त्यांना एडिशनल सेटिंग्ज दिसतील, ज्यामधून तुम्ही ‘Who can see when I’m online' हे सेट करू शकता. जर तुम्हाला हे एडिशनल फीचर दिसले तर याचा अर्थ तुम्हाला हे फीचर देखील मिळाले आहे.
तुम्ही व्हॉट्सअॅपपवर तुमचे ऑनलाइन स्टेटस फक्त त्या लोकांसाठी लपवू शकता जे ‘same as last seen’ निवडून तुमचे last seen पाहू शकत नाहीत. जर तुमचं last seen कोणी पाहू शकलं नाही, तर तुम्ही WhatsApp वर कधी एक्टिव्ह होता, हेही ते पाहू शकणार नाहीत.
तुम्ही ‘My Contact’ आणि ‘same as last seen’ निवडल्यास, याचा अर्थ नॉन कॉन्टॅक्ट लोक तुम्ही ऑनलाइन असल्याचं समजू शकणार नाही आणि जर तुम्हाला हे वैशिष्ट्य अजून दिसत नसेल, तर काळजी करू नका, कारण सध्या हे फक्त काही बीटा परीक्षकांना ऑफर केलं गेलं आहे आणि ते लवकरच सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे.