Home /News /money /

PMSBY Scheme: केवळ एक रुपयात मिळवा विमा कवच; दोन लाखांपर्यंत लाभ मिळतील

PMSBY Scheme: केवळ एक रुपयात मिळवा विमा कवच; दोन लाखांपर्यंत लाभ मिळतील

तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगला परतावा शोधत असाल तर तुम्ही एका सरकारी विमा योजनेत गुंतवणूक करू शकता. अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळेल. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSVY) आहे.

    मुंबई, 13 फेब्रुवारी : नोकरी असो वा व्यवसाय प्रत्येकजण आपलं आणि कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी प्रयत्नशील असतो. आज काम करुन थोडी गुंतवणूक करुन भविष्यातील गरजा पूर्ण (Future Planning) करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. यासाठी योग्य गुंतवणूक (Investment) करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या बाजारात विमा कंपन्यांचे (Insurance Policy) बरेच पर्याय उपलब्ध आहेत. अशात अनेकदा कोणत्या विम्यात गुंतवणूक करावी याबाबत संभ्रम निर्माण होतो. जर तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगला परतावा शोधत असाल तर तुम्ही एका सरकारी विमा योजनेत गुंतवणूक करू शकता. अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळेल. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSVY) आहे. या योजनेची ​​सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला खूप कमी प्रीमियम भरावा लागेल. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते. पण सर्वसामान्यांना या योजनेची फारशी माहिती नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या योजनेतील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. Card Protection Plan : Debit, Credit कार्ड हरवलं तरी नो टेन्शन; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची खास वैशिष्ट्ये आजच्या काळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत अपघातामुळे मृत्यू झाल्यास संरक्षणासाठी विमा काढणे अत्यंत आवश्यक आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अॅक्सिडेंटल पॉलिसी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एका वर्षात 12 रुपये गुंतवावे लागतील. या विम्यात गुंतवणूक केल्यास, पॉलिसीधारकाला 2 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. अपघात झाल्यास, तुमच्या कुटुंबाला किंवा पॉलिसी नॉमिनीला 2 लाख रुपयांची मदत रक्कम मिळते. दुसरीकडे अपघातात विमाधारक अपंग झाल्यास, त्याला 1 लाख रुपयांची मदत रक्कम मिळेल. Gold Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर कोण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 17 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे. तुमचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा कराल? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. तेथे तुम्ही या योजनेची माहिती घेऊन अर्ज (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Application Form) भरून सबमिट करा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Insurance

    पुढील बातम्या