जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Card Protection Plan : Debit, Credit कार्ड हरवलं तरी नो टेन्शन; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई

Card Protection Plan : Debit, Credit कार्ड हरवलं तरी नो टेन्शन; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई

Card Protection Plan : Debit, Credit कार्ड हरवलं तरी नो टेन्शन; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई

लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ऑटो इन्शुरन्स अशा अनेक प्रकारच्या इन्शुरन्सबद्दल तुम्ही ऐकले असेलच. त्याचप्रमाणे तुमच्या कार्डसाठी विमा देखील दिला जातो, ज्याला कार्ड प्रोटेक्शन प्लान (Card Protection Plan) म्हणतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी : खिशात रोख रक्कम घेऊन फिरण्यापेक्षा आजकाल सगळेच जण डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit, Credit card) वापराला प्राधान्य देतात. डिजिटायझेशनच्या (Digitization) युगात आता प्रत्येक काम आणि पेमेंट ऑनलाइन (Online Payment) करता येणे शक्य झालं आहे. म्हणूनच लोक अनेक ठिकाणी त्यांच्या कार्डचे तपशील देखील ठेवतात. डिजिटल व्यवहारांमुळे फसवणुकीचे अनेक प्रकारही घडत आहेत. अशा परिस्थितीत, CPP म्हणजेच कार्ड प्रोटेक्शन प्लान (Credit Card Protection Plan) तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. CPP म्हणजे काय? लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ऑटो इन्शुरन्स अशा अनेक प्रकारच्या इन्शुरन्सबद्दल तुम्ही ऐकले असेलच. त्याचप्रमाणे तुमच्या कार्डसाठी विमा देखील दिला जातो, ज्याला कार्ड प्रोटेक्शन प्लान म्हणतात. हा विमा तुम्हाला SBI पासून इतर अनेक बँकांमध्ये सर्व्हिस प्रोव्हाईड करतो. यासाठी तुम्हाला वार्षिक 900 ते 1200 रुपये द्यावे लागतील. या अंतर्गत, तुम्हाला फसवणुकीसारख्या परिस्थितीपासून संरक्षण मिळते. यामध्ये डेबिट, क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरील ऑनलाइन फसवणूक, कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास, फसवणूक, एटीएम पिनद्वारे फसवणूक झाल्यास भरपाईसाठी संरक्षण समाविष्ट आहे. Gold Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर एका कॉलमध्ये सर्व कार्ड ब्लॉक करा जर एखाद्या व्यक्तीचे पाकीट हरवले आणि त्यात क्रेडिट, डेबिट कार्ड असेल तर सर्व कार्डांचे तपशील लक्षात न राहिल्यामुळे, लोकांना एकाच वेळी कार्ड ब्लॉक करता येत नाही. परंतु CPP ग्राहक फक्त एका कस्टमर केअर फोनवर सर्व कार्ड ब्लॉक करू शकतात. अशा परिस्थितीत ग्राहकाला प्रत्येक बँकेला स्वतंत्र कॉल करण्याची गरज नाही. Rakesh Jhunjhunwala यांचं एकाच दिवसात 426 कोटींचं नुकसान; ‘हे’ शेअर ठरले कारणीभूत प्रवासात हे फायदे मिळवा प्रवासादरम्यान तुमचे कार्ड हरवल्यास CPP ग्राहकांना रोख पैसे देण्याची आवश्यकता नाही. सीपीपी, रोख रक्कम देण्यासोबतच हॉटेलचे बिल तिकीट सारखे खर्चही विमा कंपनी उचलते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात