मुंबई, 17 ऑक्टोबर : PMC म्हणजेच पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सांगितल्यानुसार, सुरजितसिंग अरोरा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या घोटाळ्याला खतपाणी घातलं. PMC बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या बँकेतल्या 4 हजार 355 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. सुरजितसिंग अरोरा हा या घोटाळ्यात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी आहे. या घोटाळ्यामध्ये(PMC Bank Scam) अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बँकेत लाखो रुपये अडकल्याने तणावामुळे दोन खातेदारांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. संजय गुलाटी आणि फत्तेमुल पंजाबी या दोन खातेदारांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला होता. (हेही वाचा : बँक घोटाळ्यात रोहित पवार यांचंही नाव : भाजप नेत्यानं केला आरोप) 59 वर्षांच्या फत्तोमल पंजाबी यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. त्यांचे नातेवाईक दीपक पंजाबी यांनी सांगितलं, PMC बँकेत फत्तोमल पंजाबी यांचे 20 लाख रुपये होते. ते पैसे त्यांना काढता येत नव्हते. त्यामुळे ते तणावात होते. याआधी ओशिवारामधल्या तारापोरेवाला गार्डन इथे राहणारे संजय गुलाटी यांचा मृत्यू झाला होता. =========================================================================================== साताऱ्यात पंतप्रधान मोदींचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.