बँक घोटाळ्यात रोहित पवार यांचंही नाव : भाजप नेत्यानं केला आरोप

बँक घोटाळ्यात रोहित पवार यांचंही नाव : भाजप नेत्यानं केला आरोप

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या म्हणजेच शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांचंही नाव असल्याचा दावा भाजपच्या माजी खासदाराने केला आहे.

  • Share this:

नाशिक, 17 ऑक्टोबर :  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या म्हणजेच शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांचंही नाव असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नाशिकमध्ये पत्रकार संवाद कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.

शरद पवार यांचे नातू आणि कर्जत - जामखेड इथून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यावर पहिल्यांदाच असा थेट आरोप झाला आहे.

भाजपच्या माजी खासदारांनी रोहित पवार यांचं नाव घेत आरोप केला आहे. नाबार्डने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये अजित पवार यांच्याबरोबर एका कारखान्याचे संचालक म्हणून रोहित पवार यांचंही नाव आहे.

हे वाचा - भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत त्यांंचं नाव असल्याचा अहवाल नाबार्ड आणि कॅगने दिला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक घोटाळ्यात नाव असल्यानं ED म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 72 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर शरद पवार स्वतः ईडी कार्यालयात जाणार अशी चर्चा होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. ईडीने अद्याप यापैकी कुणाला नोटीस जारी केलेली नाही वा अटकही केलेली नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे.

-----------------------------------------------------

अन्य बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचा पलटवार, पाहा काय म्हणाले...

आदित्य CM होण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचा टोला, प्रत्येकाला 'हा' अधिकार

सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत काय म्हणाले अमित शहा, वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

शिवरायांच्या इतिहासाचं राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला वावडं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 03:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading