पत्नीने सोशल मीडियावर केले गंभीर आरोप, भाजपचे मंत्री घटस्फोटासाठी गेले कोर्टात

पत्नीने सोशल मीडियावर केले गंभीर आरोप, भाजपचे मंत्री घटस्फोटासाठी गेले कोर्टात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री बाबूराम निषाद हे एका टिकटॉक व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांनी पत्नीविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज केलाय.

  • Share this:

हमीरपूर (उत्तर प्रदेश ), 26 सप्टेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री बाबूराम निषाद हे एका टिकटॉक व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांनी पत्नीविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज केलाय.

काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी नीतू निषाद यांनी फेसबुकवर त्यांच्याविरुद्ध पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी बाबूराम निषाद यांच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले होते.बाबूराम निषाद आणि त्यांची पत्नी नीतू निषाद यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी कोर्टाने नीतू निषाद यांना 30 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नीतू निषाद यांनी बाबूराम निषाद यांच्याविरुद्ध लखनऊच्या कैसरबाग पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती पण मंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस ही तक्रार दाखल करून घेत नाहीत, असा त्यांचा आरोप होता.

(हेही वाचा : VIDEO: झमाझम नाच राजे...भाजपच्या मंत्र्यांचा TikTokव्हिडिओ व्हायरल)

नीतू यांनी यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सुप्रीम कोर्टीचे मुख्य न्यायाधीश आणि अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश या सगळ्यांना पत्र लिहून पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. लग्नानंतर सलग 14 वर्षं त्यांचे पती मारहाण आणि शिवीगाळ करतायत, असा त्यांचा आरोप आहे.

बाबूराम निषाद हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत. 10 मे 2005 ला या दोघांचं हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झालं. आपल्या पत्नीला वैवाहिक जीवनामध्ये रस नाही, असा दावा निषाद यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जात केला आहे.नीतू निषाद माझ्याकडे लाखो रुपये मागते आणि ते देणं शक्य नाही. त्यामुळे माझ्या पत्नीसोबत राहणं मला शक्य नाही, असंही त्यांनी अर्जात लिहिलं आहे.

=====================================================================================

शरद पवारांवर कारवाई का? गिरीश महाजनांची UNCUT मुलाखत

First published: September 26, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading