मुंबई, 30 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 31 मे रोजी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojna) निधी योजनेअंतर्गत 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता जारी करतील, ज्याचा फायदा 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी या योजनेचा 11वा हप्ता शिमला, हिमाचल प्रदेश येथे जारी करतील. गरीब कल्याण संमेलनाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या 16 योजना आणि कार्यक्रमांचा लाभ घेणाऱ्या लोकांशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतील. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत गरीब कल्याण संमेलन या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता जारी करतील. दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर दिल्लीतील पुसा कॅम्पसमधून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. Post Office च्या योजनांद्वारे कमाईची संधी, ‘या’ तीन स्कीम्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा परतावा पीएम मोदींनी 1 जानेवारी 2022 रोजी 10 वा हप्ता जारी केला होता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ते वितरित केले जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 1 जानेवारी रोजी, पंतप्रधानांनी 20,000 कोटींहून अधिक रुपयांचा 10 वा हप्ता जारी केला होता, ज्याचा 10 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा झाला. पीएम मोदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार कृषी मंत्रालयाने सांगितले की, हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एकल कार्यक्रम आहे, ज्या अंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये देशव्यापी सल्लामसलत केली जाईल आणि पंतप्रधान मोदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय MyGov.in द्वारेही वेबकास्ट केले जाईल. हा कार्यक्रम इतर सोशल मीडियावरही पाहता येईल. छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकतं बँक अकाऊंट; ऑनलाईन व्यवहार करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा किसान योजनेचं स्टेटस तपासा » सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. » येथे तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय मिळेल. » येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल. » नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता. » तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर Get Data वर क्लिक करा. » येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवहाराची सर्व माहिती मिळेल. » जर तुम्हाला FTO is generated and Payment confirmation is pending असं लिहून आलं तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.