मराठी बातम्या /बातम्या /मनी /छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकतं बँक अकाऊंट; ऑनलाईन व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकतं बँक अकाऊंट; ऑनलाईन व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

डिजिटल व्यवहार ज्या वेगाने वाढत आहेत, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे डिजिटल बँकिंगचा आपल्याला खूप फायदा होत असला तरी त्याचे काही धोकादायक पैलूही आहेत. डिजिटल बँकिंगमध्ये सुरक्षितता नेहमीच धोक्यात आली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 मे : डिजिटलायझेशनच्या जगात आपल्या बँकाही डिजिटल (Digital Banking) झाल्या आहेत. आता बँकेशी संबंधित अशी अनेक कामे आहेत जी घरबसल्या काही मिनिटांत करता येतात. काही वेळा या कामांसाठी बँकेच्या लांबच लांब रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. डिजिटल बँकिंगमुळे लोकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचले आहेत.

मात्र डिजिटल व्यवहार (Online Transaction) ज्या वेगाने वाढत आहेत, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनाही वाढत आहेत. त्यामुळे डिजिटल बँकिंगचा आपल्याला खूप फायदा होत असला तरी त्याचे काही धोकादायक पैलूही आहेत. डिजिटल बँकिंगमध्ये सुरक्षितता नेहमीच धोक्यात आली आहे. या धोक्याचा फायदा घेऊन सायबर ठग लोकांची खाती रिकामी करतात. सायबर क्राईम पोलिसांच्या नोंदींमध्ये डिजिटल बँकिंग फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

ऑनलाइन फसवणुकीबाबत सूचना

पोलीस प्रशासनापासून ते बँका, वित्तीय संस्थां लोकांना वेळोवेळी ऑनलाइन फसवणुकीबाबत सतर्क करत असतात. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने लोकांना खोट्या मेसेजबाबत सतर्क केले आहे.

Masked Aadhar Card: मास्क्ड आधारकार्डबद्दल माहित आहे का? कुठे केला जातो वापर? चेक करा सर्वकाही

एसबीआयने आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्याला त्याचे बँक खाते ब्लॉक झाल्याचा मेसेज आला तर असे मेसेज पूर्णपणे फेक आहेत. अशा मेल किंवा मेसेजना कधीही प्रतिसाद देऊ नका. असे बनावट मेसेज मिळाल्यावर phishing@sbi.co.in. या ठिकाणी तक्रार नोंदवा.

तुमच्याकडील 500, 2000 ची नोट बनावट तर नाही ना? रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टने वाढली चिंता

अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक टाळा

>> अनोळखी नावांवरील ईमेल, एसएमएसमधील लिंक किंवा अटॅचमेंटवर कधीही क्लिक करू नका.

>> लॉटरी जिंकणे, आयकर वाचवणे, अपेक्षेपेक्षा जास्त सवलत किंवा मोफत भेटवस्तू अशा फंदात पडू नका.

>> बँक खाते, एटीएम किंवा डेबिट कार्ड क्रमांक, पासवर्ड आणि ओटीपी कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.

>> तुम्ही तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहिले पाहिजे.

>> सार्वजनिक ठिकाणी दिलेले मोफत वाय-फाय पैशांच्या व्यवहारासाठी वापरू नका.

First published:

Tags: Bank services, Digital services, Online fraud