नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) यांनी ईमानदारीने कर भरणाऱ्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन-ऑनरिंग द ऑनेस्ट' (Transparent Taxation- Honoring the Honest) असे या प्लॅटफॉर्मचे नाव आहे. पंतप्रधानांनी नवीन सुधारणांची घोषणा करत असे म्हटले की, यामुळे करदात्यांना खूप फायदा होईल. अशाप्रकारे ईमानदारीने कर भरणाऱ्या करदात्यांना पुरस्कृत करण्यासाठी आजपासून डायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्सच्या (Direct Tax Reforms) पुढील टप्प्याची सुरुवात होत आहे. पंतप्रधानांनी अशी माहिती दिली की, फेसलेस असेसमेंट आणि टॅक्सपेअर चार्टरसारखे महत्त्वाच्या सुधारणा आजपासून लागू केल्या जाणार आहेत.
A Faceless Assessment System paving the way for timely completion of matters. #HonoringTheHonest @FinMinIndia @nsitharaman @PMOIndia @PIB_India @MIB_India pic.twitter.com/8lKCKcovMt
— MyGovIndia (@mygovindia) August 13, 2020
पंतप्रधान असे म्हणाले की, 'देशामध्ये सुरु असणारी स्ट्रक्चरल रिफॉर्मची प्रक्रिया आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. एकविसाव्या शतकाच्या करप्रणालीच्या या नवीन व्यवस्थेचे आजपासून लोकार्पण केले जात आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter सारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. Faceless Assessment आणि Taxpayers Charter आजपासून लागू होत आहेत.'
(हे वाचा-18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द, हे काम पूर्ण न केल्यास बसेल आर्थिक फटका)
यावेळी पंतप्रधान असे म्हणाले की, 'गेल्या सहा वर्षांमध्ये Banking the Unbanked, Securing the Unsecured आणि Funding the Unfunded हे आमचे लक्ष्य राहिले आहे. ईमानदार करदात्यांची राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा करदात्यांचे जीवन सोपे होते तेव्हा तो पुढे जाऊ शकतो आणि त्यामुळे देश देखील पुढे जातो. आजपासून सुरू झालेल्या नवीन व्यवस्था देशवासियांच्या आयुष्यात सरकारची दखल कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.' विदेशी गुंतवणुकीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 'विदेशी गुंतवणूकदारांचा देखील भारतावरील विश्वास वाढू लागला आहे. कोरोनाच्या संकटकाळात देखील मोठ्या प्रमाणात एफडीआय (FDI) हा याचा पुरावा आहे.'
(हे वाचा-15 हजार कमावणाऱ्याला सरकार दरवर्षी देणार 36 हजार पेन्शन, वाचा या योजनेबद्दल)
पीएम नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, 'भारतातील करप्रणालीमध्ये मौलिक आणि संरचनात्मक बदलाव आणणे यासाठी गरजेचे होते कारण ही प्रणाली पारतंत्र्यांच्या काळात बनलेली आहे आणि यामध्ये हळूहलू सुधारणा झाली आहे. स्वातंत्र्यानंतर यामध्ये थोडेफार बदल झाले पण अधिकतर प्रणाली तिच आहे.'
वर्ष 2012-13 में जितने टैक्स रिटर्न्स होते थे, उसमें से 0.94 परसेंट की स्क्रूटनी होती थी।
वर्ष 2018-19 में ये आंकड़ा घटकर 0.26 परसेंट पर आ गया है। यानि केस की स्क्रूटनी, करीब-करीब 4 गुना कम हुई है: PM @narendramodi #HonoringTheHonest — PMO India (@PMOIndia) August 13, 2020
'2012-13 मध्ये जेवढे टॅक्स रिटर्न होत होते आणि त्याची स्क्रूटनी असायची आज ती कमी झाली आहे. कारण आम्ही करदात्यांवर विश्वास ठेवला आहे. आज 130 कोटींपैकी केवळ दीड कोटी लोकच कर भरतात ही संख्या खूप कमी आहे. प्रत्येक व्यक्तीला यावर विचार करणे गरजेचे आहे. यामुळे देश आत्मनिर्भरतेकडे जाईल. लोकांनी 15 ऑगस्टपासून कर देण्याचा संकल्प करावा'.
पंतप्रधानांनी अशी माहिती दिली आहे की, यातील काही सुविधा आजपासून लागू झाल्या आहेत तर संपूर्ण सेवा 25 सप्टेंबरपासून लागू होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi