जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'जन समर्थ पोर्टल' लॉन्च, सर्व सरकारी योजनांची माहिती एकाच पोर्टलवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'जन समर्थ पोर्टल' लॉन्च, सर्व सरकारी योजनांची माहिती एकाच पोर्टलवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'जन समर्थ पोर्टल' लॉन्च, सर्व सरकारी योजनांची माहिती एकाच पोर्टलवर

Jan Samarth Portal: जन समर्थ हे एक डिजिटल पोर्टल आहे जिथे 13 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. डिजीटल पद्धतीने लाभार्थी आपली पात्रता तपासू शकतात. पात्र योजनांमध्ये डिजिटल अर्ज करता येऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी जन समर्थ पोर्टल (Jan Samarth Portal) लाँच केलं आहे. क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी (Government Schemes) हे एक राष्ट्रीय पोर्टल आहे. विज्ञान भवन येथे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक वीक सेलिब्रेशन’ दरम्यान हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे पोर्टल केवळ विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांचे जीवन सुकर करेल असे नाही तर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यातही मदत करेल. विद्यार्थ्यांना कोणत्या सरकारी योजनेचा सर्वाधिक फायदा होईल हे त्यांना कळेल आणि आम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकतो हे देखील कळेल. तरुण, मध्यमवर्गीयांसाठी एंड-टू-एंड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून हे पोर्टल काम करेल. स्वयंरोजगारात महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या मंत्रालयांच्या वेगवेगळ्या वेबसाइटला भेट देण्याऐवजी भारत सरकारच्या एका पोर्टलवर पोहोचणे चांगले आहे आणि तिथेच समस्या सोडवली गेली पाहिजे. याच ध्येयाने ‘जन समर्थ पोर्टल’ आज सुरू करण्यात आले आहे. 21व्या शतकातील भारत लोककेंद्रित प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रगती करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या प्रदीर्घ विकास प्रवासाचाही त्यांनी उल्लेख केला आणि स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे स्मरणही केले. वीज बिलाच्या खर्चातून कायमचं मुक्त व्हा; सोलर पॅनल बसवा, सरकारकडून सबसिडी मिळेल जन समर्थ पोर्टल काय आहे? जन समर्थ हे एक डिजिटल पोर्टल आहे जिथे 13 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. डिजीटल पद्धतीने लाभार्थी आपली पात्रता तपासू शकतात. पात्र योजनांमध्ये डिजिटल अर्ज करता येऊ शकतो. सध्या चार कर्जाच्या  श्रेणी येथे आहेत. प्रत्येक कर्ज श्रेणीत सरकारच्या काही योजना आहेत. अर्ज करताना काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानुसार योजनेतंर्गत तुमची पात्रता तपासली जाईल. Multibagger Share: 11 रुपयांचा शेअर खरेदी करुन कमावले लाखो रुपये; तुमच्याकडे आहे का? अर्ज कोण करु शकतो आणि आवश्यक कागदपत्रे? भारतातील कोणताही नागरिक यासाठी अर्ज करू शकतो. पात्रतेनुसार कर्जाच्या श्रेणी बदलतील, त्यानुसार तुम्हाला अर्ज करावा लागेल. योजना, कर्जासाठी पात्र तुम्ही असाल तर ऑनलाइन माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकता. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आदींचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात