मुंबई, 23 जुलै : सौंदर्य उत्पादनं (Beauty Products) आणि ब्युटी पार्लरची (Beauty Parlour) बाजारपेठ गेल्या काही वर्षांत झपाट्यानं वाढली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत ब्युटी पार्लर सुरू झाली आहेत. लग्न असो किंवा इतर कोणताही उत्सव असो, प्रत्येक प्रसंगी महिला ब्युटी पार्लरपर्यंत पोहोचत असतात आणि देशाच्या प्रत्येक भागात सौंदर्याचा व्यवसाय (Beauty Business) झपाट्यानं वाढत आहे. एका अहवालानुसार, आगामी काळात भारतातील सौंदर्य व्यवसाय अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेपेक्षा दुप्पट वेगानं वाढेल. महिला असो वा पुरुष, प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतं. अशा स्थितीत भारतातील जलद शहरीकरण आणि वाढत्या काम करणाऱ्या लोकसंख्येमुळं या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. जर तुम्ही एखादे छोटे ब्युटी पार्लर किंवा सलून उघडण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रात तुमचा हात आजमावू शकता. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, त्याची किंमत आणि परतावा याबद्दल संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तुमचे ग्राहक ओळखा- जर तुम्ही ब्युटी पार्लर किंवा सलून उघडणार असाल तर सर्वप्रथम तुमच्या ग्राहकांना ओळखा. म्हणजे ज्या भागात तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करणार आहात, जसं की तिथली लोकसंख्या आर्थिकदृष्ट्या कशी आहे? यानंतर तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये कोणत्या प्रकारचे उत्पादन वापरायचं हे ठरवायचं आहे. तसेच तुम्ही ग्राहकांना कोणत्या प्रकारची सेवा द्याल. त्यानुसार तुमच्या पार्लर व्यवसायाची किंमत ठरवली जाईल. हेही वाचा: भांडवलाशिवाय घरबसल्या करा ‘हे’ बिझनेस; नोकरी सोडण्याचीही गरज नाही सेवा आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करा- सुरुवातीला, सेवेची किंमत जास्त ठेवण्याऐवजी, आपण त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुमच्या पार्लरमध्ये व्यावसायिक कामगार ठेवा, जे गरजेनुसार ग्राहकांना योग्य सल्लाही देऊ शकतात. तुम्हाला तुमचा पार्लर व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर ग्राहकांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू नका. तसेच पार्लरचा व्यवसाय तुमच्या वागण्यावर खूप अवलंबून असतो. नेहमी तुमचे नियमित ग्राहक ओळखण्याचा प्रयत्न करा. या व्यवसायासाठी एक स्थान निवडा जिथून ग्राहक तुमचे सलून किंवा पार्लर सहज पाहू शकतील. तुमचा पार्लर व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नवीन फॅशनची सर्व माहिती ठेवा. ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांकडे विशेष लक्ष द्या. किती पैसे लागतील- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 3 लाख रुपये लागतील. यामध्ये तुम्हाला यंत्रसामग्री, उपकरणे, खुर्च्या, आरसे, फर्निचर या सर्व गोष्टींवर 2 लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागेल. या व्यवसायासाठी तुम्ही सरकारकडून कर्जही मिळवू शकता. कर्ज मिळू शकते- प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. कर्जाचे व्याज दर बँकेनुसार बदलू शकतात. हे बँकांवर अवलंबून आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर आहे. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत राहिल्यास कर्जाचा व्याजदरही माफ होतो. घ्यावा लागेल परवाना- सलून चालवण्यासाठी तुम्हाला राज्य सरकारचा परवाना आवश्यक आहे. व्यवसायाच्या क्षेत्रानुसार, तुम्हाला महानगरपालिकेकडून व्यवसाय परवाना, जीएसटी क्रमांक घ्यावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.