मुंबई, 24 जुलै : महागाई वाढल्यामुळे खर्चही वाढला आहे. जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी नोकरी करणं काही वेळा पुरेसं ठरत नाही. त्यावर उपाय म्हणून एखादा बिझनेस सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते; मात्र कधी भांडवलाच्या अभावी तर कधी वेळेअभावी बिझनेस सुरू करणं शक्य होत नाही. आता बिझनेससाठीचे नवनवीन पर्याय समोर येत आहेत. घरबसल्या काय काय शक्य होतं हे कोरोना महामारीनं जगाला शिकवलं. त्याचाच उपयोग करून भांडवलाशिवायच्या बिझनेस आयडियाजबाबत (Business Without Investent) जाणून घेऊ या. बिझनेस करण्यासाठी मोठी भांडवल गुंतवणूक, भरपूर मनुष्यबळ ही गरज आता संपली आहे. बिझनेससाठीच्या अनेक नव्या कल्पना सध्या बाजारात येत आहेत. असा बिझनेस करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता नसते. शिवाय एखादी नोकरी करूनही (Can Do Job And Business Together) उरलेल्या वेळात असा बिझनेस करता येऊ शकतो. ब्लॉग सध्या ब्लॉग आणि व्लॉगचा काळ आहे. एखादा चांगला मोबाइल असेल, तर व्लॉग करून त्यावरच्या जाहिरातींद्वारे पैसे कमावता येऊ शकतात. ऑनलाइन ब्लॉग (Blog Writting) सुरू केला, तर त्यावरही जाहिराती मिळू शकतात. त्याद्वारे काही पैसे नक्कीच कमावता येतील. हे वाचा - Saving Tips: पैशांची बचत होत नाहीत? ‘या’ गोष्टी ठरवा, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्की पैसे जमा होतील कंटेंट रायटिंग सोशल मीडियाचा उदय झाल्यामुळे कंटेंट रायटिंगला प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. विविध संस्था, कंपन्या, वेबसाइट्स, राजकीय पक्ष यांच्यासाठी कंटेंट रायटिंग करण्याची मोठी संधी आहे. त्याचा फायदा घेऊन नोकरीव्यतिरिक्त जास्तीचे पैसे मिळवता येऊ शकतात. यात फ्री-लान्सिंगचाही (Freelance Content Writing) पर्याय असतो. अर्थात घरबसल्या आपल्या सोयीच्या वेळेनुसार कंटेंट रायटिंग करता येतं. अफिलिएट मार्केटिंग अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) म्हणजे एखाद्या कंपनीच्या इंटरनेटवरच्या उत्पादनांची, वेबसाइट्सवरच्या उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी प्रयत्न करणं. यासाठीदेखील कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. एखाद्या कंपनीची उत्पादनं विकण्यासाठी प्रयत्न करून प्रत्येक ग्राहकामागे मिळणारं कमिशन हा उत्पन्नाचा चांगला स्रोत होऊ शकतो. वस्तू आणि सेवा या दोन्हींसाठी हा व्यवसाय करता येतो. शिक्षक तुम्हाला एखाद्या विषयातलं चांगलं ज्ञान असेल, तर घरबसल्या ऑनलाइन शिकवणी सुरू करता येईल. यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही शिकवता येईल. घरच्या घरी ऑनलाइन क्लासेसमुळे पैसे कमावण्याची चांगली संधी मिळू शकते. हे वाचा - Job Opportunity : काम अत्यंत साधं, कोट्यवधींचा वार्षिक पगार तरीही मिळत नाहीत कामगार घरबसल्या बिझनेस करण्यासाठी केवळ एखादा लॅपटॉप किंवा मोबाइल आणि इंटरनेट इतकीच आवश्यकता असते. त्यामुळे नोकरी करून उरलेल्या वेळेत हवा तो बिझनेस करता येऊ शकतो. संधी शोधली, तरच ती सापडते. त्यामुळे आपल्या वेळेचा, आर्थिक गरजेचा अंदाज घेऊन सोयीनुसार बिझनेस करता येऊ शकतो. अर्थात कोणतीही गोष्ट मनापासून केली, तरच त्याचं योग्य फळ मिळतं. त्यामुळे अशा बिझनेसमध्ये भांडवल नाही, पण वेळ आणि मेहनतीची तयारी असेल, तर नक्कीच नफा कमावता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.