Home /News /national /

Independence Day 2021: 15 ऑगस्टनिमित्त पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरुन भाषण, नरेंद्र मोदींच्या भाषणातले मुद्दे वाचा सविस्तर

Independence Day 2021: 15 ऑगस्टनिमित्त पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरुन भाषण, नरेंद्र मोदींच्या भाषणातले मुद्दे वाचा सविस्तर

Independence Day 2021: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं.

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: PM Modi addresses nation on Independence Day: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, देशाला एकजूट राष्ट्र म्हणून आकार देणारे सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारताला भविष्याचा मार्ग दाखवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक महान व्यक्तित्वांचे स्मरण देश करत आहे. देश या सर्वांचा ऋणी आहे. आजपासून प्रारंभ होत पुढील 25 वर्षे होणारा विकासाचा प्रवास हा भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड आहे. या अमृत कालखंडात आपल्या संकल्पांची पूर्तता होईल, आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत नेईल. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपले डॉक्टर, आपल्या परिचारिका, आपले निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस तयार करण्यामध्ये गुंतलेले शास्त्रज्ञ असोत, सेवा करणारे नागरिक असोत, हे सर्वच वंदन करण्यायोग्य आहेत. केंद्र असो किंवा राज्य सर्व सरकारी कार्यालयांनी आपल्याकडील नियम आणि प्रक्रियांची माहिती घ्या आणि अडथळे दूर करा. कोरोनाच्या काळात भारतीय वैज्ञानिकांनी उत्तम काम केले. कोरोना लसीसाठी आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागत नाही. फक्त विचार करा की, आज आपल्याकडे स्वदेशी कोरोना लस नसती तर काय झाले असते? नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी प्रगती, जगात स्वच्छ उर्जासाठी भारताला ओळखलं जाईल. भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच या दशकापर्यंत 450 गिगावॅट अपारंपारिक उर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करु शकतात. आजपासून 25 वर्षांनी 2047 मध्ये जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या ते भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. 25 वर्षानंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल. मला अनेक मुलींनी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळावं यासाठी विनंती केली. आम्ही मिझोरममध्ये प्रयोग केला होता. पण आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आता मुलीही तिथे शिक्षण घेणार आहेत. आज अनेक नवे स्टार्टअप येत आहेत. सरकार या स्टार्टअपसोबत उभी आहे. आर्थिक मदत, करात सूट असं सर्व काही केलं जात आहे. करोनाच्या काळात हजारो नवे स्टार्टअप उभे राहिले. यशस्वीपपणे वाटचाल सुरु आहे. यांची बाजारकिंमत हजार कोटींपर्यत पोहोचत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Independence day, PM, Pm modi, Pm modi speech, Red fort

    पुढील बातम्या