जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM kisan Yojana : तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत 2 हजार तर या नंबरवर करा कॉल

PM kisan Yojana : तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत 2 हजार तर या नंबरवर करा कॉल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास का होतोय उशीर, कारण आलं समोर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास का होतोय उशीर, कारण आलं समोर

यावेळी साधारण 2 कोटी 62 लाख शेतकरी बाराव्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. उत्तर प्रदेशातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता मिळालेला नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला. गेल्यावेळी जिथे 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते, यावेळी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. यावेळी साधारण 2 कोटी 62 लाख शेतकरी बाराव्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. उत्तर प्रदेशातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता मिळालेला नाही. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने यूपीतील ज्या शेतकऱ्यांना पैशांचा 12 वा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक नंबर दिला आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी उत्तर प्रदेश सरकारने टोल फ्री नंबर जाहीर केला. या क्रमांकावर फोन करून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर उत्तरं मिळू शकतात. उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विकास ब्लॉकमध्ये शासकीय कृषी बियाणे स्टोअरमध्ये हेल्पडेस्कही उभा करण्यात आला आहे.

तुमचं बँक खातं कधी फ्रीज केलं जातं, हा अधिकार बँकेला असतो का?

उत्तर प्रदेशातील शेतकरी 18001801488 टोल फ्री क्रमांकावर फोन करून अनेक समस्यांवर उपाय शोधू शकतात. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनिवार्य ई-केवायसी करावं असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे. आतापर्यंत ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले आहेत. राज्यातील प्रत्येक ब्लॉकमधील स्टेट अॅग्रीकल्चर स्टोअरमध्ये उभारण्यात आलेल्या हेल्प डेस्कवरही शेतकरी आपल्या भूखंडाची पडताळणी करून घेऊ शकतात. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबतही इथे उत्तरं मिळणार आहेत.

वाद टाळण्यासाठी भाडेकरू-घरमालकाने कोणती खबरदारी घ्यावी? या नवीन कायद्यात दोघांना अधिकार
News18लोकमत
News18लोकमत

खात्यापर्यंत 12 वा हप्ता पोहोचला नाही तर पीएम किसान योजना 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय pmkisan-ict@gov.in ई-मेल आयडीवरही तुम्ही तुमची तक्रार मेल करू शकता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देते. ही रक्कम एका वर्षात दोन हजार रुपये तीन हप्त्यात दिले जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात