जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमचं बँक खातं कधी फ्रीज केलं जातं, हा अधिकार बँकेला असतो का?

तुमचं बँक खातं कधी फ्रीज केलं जातं, हा अधिकार बँकेला असतो का?

तुमचं बँक खातं कधी फ्रीज केलं जातं, हा अधिकार बँकेला असतो का?

तुमचं खातं ब्लॉक केलं जाऊ शकतं? पण कधी विचार केलाय का, की हे कोण करतं? खातं फ्रीज होतं म्हणजे नेमकं काय याचे अधिकार कोणाला असतात याबद्दल आज जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सहकारी बँकांवर RBI नियमबाह्य वागल्याने कारवाई करत आहे. बऱ्याचदा आता आपल्या कानावर किंवा मेसेजमध्ये देखील येतं की तुमचं खातं फ्रीज केलं जाऊ शकतं, तुमचं खातं ब्लॉक केलं जाऊ शकतं? पण कधी विचार केलाय का, की हे कोण करतं? खातं फ्रीज होतं म्हणजे नेमकं काय याचे अधिकार कोणाला असतात याबद्दल आज जाणून घेऊया. बँक खाते फ्रीज होतं म्हणजे त्याचा अर्थ असा की पुढील सूचना येईपर्यंत आपण तुमच्या खात्यात कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत किंवा होऊ शकणार नाहीत. यापूर्वी दिलेले चेकही वटणार नाहीत. अकाउंट फ्रीज झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या अकाउंटवर नजर ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या पगारासह इतर डिपॉजिट मिळू शकतात. खातं फ्रीज झाल्याचे परिणाम खातं फ्रीज झाल्यानंतर तुमच्या खात्यावर कोणी रक्कम भरू शकत नाही किंवा खात्यातून काढू शकत नाही. जी रक्कम तुमच्या खात्यावर असेल ती अडकून राहिल तुम्हाला ती वापरता येणार नाही जोपर्यंत तशा सूचना येत नाहीत.

Share Market मधून महत्त्वाची बातमी! या दिवशी विकता येणार नाही स्टॉक

अशावेळी तुमचे ऑटो डेबिट असलेले पेमेंटही अडकतात. याशिवाय लोन पेमेंट, म्युचुअल फंड पेमेंट, क्रेडिट कार्ड पेमेंट, वीजबिल अशी अन्य गोष्टींसाठ पेमेंट तुम्ही करू शकत नाही. खातं फ्रीज होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. हे फ्रीज करण्याचा निर्णय कोण घेतं हे देखील जाणून घेणार आहोत. कोणाकडे असतो अधिकार? मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंगसारख्या बेकायदेशीर कामातून आलेले पैसे किंवा इतर व्यवहार जे संशयास्पद आहेत अशा सगळ्या कारणांसाठी बँक खातं फ्रीज केलं जाऊ शकतं. बँक खातं फ्रीज करण्याचे आदेश देण्याचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, इन्कम टॅक्स अधिकारी किंवा न्यायालये अशा नियामकांना आहेत.

NPS च्या ‘या’ खात्यात गुंतवणूक केल्यास टॅक्समधून मिळणार सूट? काय सांगतो नियम

बँकेला संशयास्पद गोष्टी आढळल्यास बँक देखील खातं फ्रीज करू शकते. बँकेला खातं फ्रीज करण्याआधी त्या व्यक्तीला नोटीस पाठवणं मात्र बंधनकारक आहे. नोटीस नसताना खातं फ्रीज करू शकत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

बँक खातं फ्रीज करण्याची कारणं? अनेकदा नोटीस देऊनही तुम्ही कर्ज भरले नसेल तर. थकीत कर भरला नाही तर खात्यात संशयास्पद हालचाली होत असतील तर मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंगसाठी खात्याचा वापर केला तर एखाद्या संस्थेच्या/व्यक्तीच्या न भरलेल्या पैशांमुळेही खातं फ्रीज केलं जातं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात