जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SSY, SCSS, NSC Vs PPF: ‘या’ पोस्ट ऑफिस बचत योजना सुपरहिट आहेत, लोकप्रियतेमध्ये पीपीएफलाही टाकलं मागं

SSY, SCSS, NSC Vs PPF: ‘या’ पोस्ट ऑफिस बचत योजना सुपरहिट आहेत, लोकप्रियतेमध्ये पीपीएफलाही टाकलं मागं

Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही

Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही

Post office Saving Schemes: आर्थिक वर्ष 2021-22 च्या आकडेवारीनुसार, NSC चं नेट कलेक्शन 19,619.86 कोटी रुपये, SCSSचं 22,129 कोटी रुपये आणि SSYचं 23,486 कोटी रुपये आहे. तर पीपीएफचे नेट कलेक्शन केवळ 12,846 कोटी रुपये आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) कर वाचवण्याच्या तसेच चांगला परतावा देण्याच्या दृष्टीनं खूप लोकप्रिय आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास E-E-E (Exempt, Exempt, Exempt) चा फायदा मिळतो. याचा अर्थ गुंतवणुकीच्या रकमेबरोबरच त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हींवर करमाफीचा लाभ मिळतो. तसेच त्यावर मिळणारा व्याजदरही चांगला आहे. पण आता पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या बचत योजनांनी (Post Office Saving Schemes)  ठेवी किंवा संकलनाच्या बाबतीत पीपीएफला मागं टाकलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून या योजनांची लोकप्रियता उघड झाली आहे. वित्त मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की 2021-21 या आर्थिक वर्षात पोस्ट ऑफिसची वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) याचं संकलन PPF पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजेच, लोक पीपीएफपेक्षा पोस्ट ऑफिसच्या SCSS, NSC आणि SSY सारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. या सर्व योजना चांगल्या परताव्यासह सुरक्षिततेची हमी देतात. यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या ठेव भांडवलाचं जोखमीपासून संरक्षण करणं. तसेच, ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त व्याजाचा लाभ देखील देते. सरकारनं संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2021-22 या आर्थिक वर्षात PPF चे एकूण संकलन 21,302 कोटी रुपये होते. SCSS चे एकूण संकलन 32,507 कोटी रुपये होते, तर NSC चे 40,264 कोटी रुपये आणि SSY चे 24,060 कोटी रुपये होते. या योजनांचे निव्वळ संकलन पीपीएफपेक्षाही जास्त आहे.  2021-22 च्या आर्थिक वर्षातील आकडेवारी दर्शवते की NSC अंतर्गत निव्वळ संकलन 19,619.86 कोटी रुपये होते, SCSS चे निव्वळ संकलन 22,129 कोटी रुपये आणि SSY चे 23,486 कोटी रुपये होते. तर पीपीएफचे निव्वळ संकलन केवळ 12,846 कोटी रुपये आहे. हेही वाचा-    ITR for Minors: मुलांच्या उत्पन्नावरही आयकर लागतो का? वाचा काय आहेत नियम

पोस्ट ऑफिसच्या या सर्व अल्पबचत योजनांचा उद्देश वेगवेगळा आहे आणि त्याच उद्दिष्टांना समोर ठेवून त्यांची वैशिष्ट्येही ठेवण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, सुकन्या समृद्धी योजना (SSY) मुलींसाठी खूप फायदेशीर आहे, तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) 60 वर्षे ओलांडलेल्या वृद्धांना लाभ देते. दुसरीकडे, PPF चा उद्देश दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक आहे, ज्यामध्ये बहुतेक लोक त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे ठेवतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ची खासियत म्हणजे ठराविक कालावधीत चांगला परतावा मिळवणे. ज्यावर आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात