Home /News /money /

PM Kisan: ही सेवा झाली बंद, कोट्यवधी लाभार्थ्यांवर होणार परिणाम; अशाप्रकारे तपासा

PM Kisan: ही सेवा झाली बंद, कोट्यवधी लाभार्थ्यांवर होणार परिणाम; अशाप्रकारे तपासा

PM Kisan: या योजनेत समाविष्ट असलेली एक महत्त्वाची सुविधा सरकारनं आता बंद केली आहे. ही सुविधा बंद झाल्यामुळे कोट्यवधी लाभार्थ्यांना आपलं स्टेटस (PM Kisan yojana status) तपासता येणार नाही.

नवी दिल्ली, 14 जानेवारी: देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' (PM Kisan Samman Nidhi Yojana) चालवली जाते. जर तुम्हीदेखील या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी (PM Kisan Beneficiaries) एक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या योजनेत समाविष्ट असलेली एक महत्त्वाची सुविधा सरकारनं आता बंद केली आहे. ही सुविधा बंद झाल्यामुळे कोट्यवधी लाभार्थ्यांना आपलं स्टेटस (PM Kisan yojana status) तपासता येणार नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेशी (PM Kisan yojana) निगडित असलेल्या शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांची माहिती सुरक्षित राहील मात्र, त्यासोबतच त्यांना काही अडचणींचा देखील सामना करावा लागणार आहे. ही सुविधा झाली बंद आतापर्यंत, पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन (Registration in PM Kisan yojana) केल्यानंतर शेतकरी आपलं स्टेटस तपासू शकत होते. पीएम किसान पोर्टलला (PM Kisan Portal) भेट देऊन, कोणताही शेतकरी आपला आधार क्रमांक (Aadhaar number), मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक वापरून अॅप्लिकेशनची सद्यस्थिती काय आहे, आपल्या बँक खात्यात किती हप्ता जमा झाला आहे, अशा गोष्टींची माहिती मिळवू शकत होता. आता मात्र, या सुविधेमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकरी पीएम किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांक वापरू शकणार नाहीत. येथून पुढे अॅप्लिकेशन स्टेटस (Application Status) जाणून घेण्यासाठी आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकच वापरता येणार आहे. हे वाचा-IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, तुमच्या शहरात काय आहे किंमत म्हणून करण्यात आला बदल मोबाईल क्रमांक वापरून स्टेटस तपासणं खूप सहज आणि सोप होतं, यात शंका नाही. मात्र, या सुविधेचे अनेक तोटेदेखील होते. अनेक लोक इतर कोणाचाही मोबाईल नंबर टाकून स्टेटस तपासायचे. मोबाईल क्रमांक ही सहज उपलब्ध होणारी गोष्ट असल्यानं इतर कुणीही शेतकर्‍यांची माहिती मिळावत असे. त्यामुळे आता मोबाईल क्रमांक वापरण्याची सुविधा बंद केली जाणार आहे. हे वाचा-कोणत्या बँक खात्याला लिंक आहे तुमचं Aadhaar Card; असं शोधू शकता चुटकीसरशी सुमारे 12 कोटी लोकांना बसणार फटका या बदलाचा थेट परिणाम 12 कोटी 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत वेळोवेळी सात बदल करण्यात आलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच, लाभार्थ्यांना ई-केवायसी (e-KYC) करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. सध्या त्याला काही दिवस स्थगिती देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना पण निश्चित उत्पन्न मिळू लागलं आहे त्यामुळे शेतकरी खूश आहेत. शेती हा तसा बेभरवशी व्यवसाय आहे त्यामुळे निश्चित उत्पन्नाचा शेतकऱ्यांना उपयोग आहे
First published:

Tags: PM Kisan

पुढील बातम्या