Home /News /money /

PM Kisan 11th Installment: काही आठवड्यात येणार योजनेचा 11वा हप्ता, लगेच तपासा तुमचं स्टेटस

PM Kisan 11th Installment: काही आठवड्यात येणार योजनेचा 11वा हप्ता, लगेच तपासा तुमचं स्टेटस

PM Kisan: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. जाणून घ्या या योजनेचा पुढील हप्ता लाभार्थ्यांना कधी मिळेल

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 29 जानेवारी: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan scheme 10th installment) योजनेचा 10वा हप्ता 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. हा हप्ता जमा करण्यात आल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील कागदपत्रांत बदल करण्यात आले होते. त्यानुसार सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड (Ration card for PM Kisan Scheme) देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांचा रेशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची (Aadhar card) सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक (bank passbook) आणि डिक्लेरेशन सादर करावं लागणार आहे. या कागदपत्रांशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेतील फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये बदल केले होते. दरम्यान, आता या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार आहे, ते जाणून घ्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. जानेवारीत दहावा हप्ता मिळाल्यानंतर अकरावा हप्ता एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर तुमचे स्टेटस चेक करावे लागेल. यासंदर्भात हिंदी मनी कंट्रोलने वृत्त दिलंय. हे वाचा-बँकिंगसह अनेक नियमांत होणार मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम अशाप्रकारे तपासाल स्टेटस -सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या (PM Kisan) अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. - येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा (Farmers Corner) पर्याय दिसेल. - येथे Beneficiary Status या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तिथे एक पेज ओपन होईल. - नवीन पेजवर, आधार नंबर, बँक अकाउंट नंबर किंवा मोबाइल नंबर यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन नंबरद्वारे तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता. - तुम्ही निवडलेल्या ऑप्शनचा नंबर तिथे भरा. त्यानंतर Get Data वर क्लिक करा. हे वाचा-LIC IPO: एलआयसी पॉलिसीधारकांना या आयपीओमध्ये किती मिळणार फायदा? पूर्ण करा हे काम - इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शनची सर्व माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता कधी जमा झाला आणि कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला, याची माहिती मिळेल. - तुम्हाला येथे 9व्या आणि 8व्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल. - जर तुम्हाला FTO is generated and Payment confirmation is pending असं लिहिलेलं दिसत असेल तर, तुमच्या अकाउंटमध्ये हप्त्याचे पैसे जमा होण्याची प्रोसेस होत आहे, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर वरील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या अकाउंट स्टेटसची माहिती मिळवू शकता.
First published:

Tags: Farmer, Finance, Money, Payment, PM Kisan, Ration card, Savings and investments

पुढील बातम्या