Home /News /money /

बँकिंगसह अनेक नियमांत होणार मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

बँकिंगसह अनेक नियमांत होणार मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून बॅकिंगसह (Banking) अनेक क्षेत्रांतील नियम (Rules) बदलणार आहेत. तुमच्या जीवनाशी संबंधित या नियमांमधील बदल तुमच्या खिशावरही परिणाम करणार आहेत.

     मुंबई, 29 जानेवारी-   येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून बॅकिंगसह  (Banking)  अनेक क्षेत्रांतील नियम  (Rules)  बदलणार आहेत. तुमच्या जीवनाशी संबंधित या नियमांमधील बदल तुमच्या खिशावरही परिणाम करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात बॅंक ऑफ बडोदा, एसबीआय बॅंक आणि पीएनबी बॅंकेचे ट्रान्झॅक्शनशी (Transaction) संबंधित नियम बदलणार आहेत. तसंच 1 फेब्रुवारी 22पासून एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीतही बदल होणार आहेत. त्यामुळे सिलिंडरचे दर नेमके किती वाढणार की स्थिर राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प  (Budget)  सादर करणार आहेत. त्यामुळे या दिवसापासून अनेक नियम बदलतील. या अर्थसंकल्पाकडून करदात्यांसह व्यापारी आणि नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा आहेत. कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेत  (Third Wave)  सरकारने अर्थव्यवस्थेला चालना द्यावी आणि उद्योग-व्यवसायवाढीसाठी मदत करावी, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढली- `एसबीआय`ने (SBI) दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांदरम्यान रक्कम ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने IMPS च्या माध्यमातून ट्रान्झॅक्शनची रक्कम 2 लाखांवरून वाढवत 5 लाख रुपये केली होती. रिझर्व्ह बॅंकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवली होती. त्यामुळे ग्राहक आता एका दिवसात 2 लाखांऐवजी 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकतात. बॅंक ऑफ बडोदाचेही नियम बदलणार- 1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाचे (Bank Of Baroda) चेक क्लिअरन्सशी (cheque Clearance) संबंधित नियम बदलणार आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून चेक अर्थात धनादेशाव्दारे पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा (Positive Pay System) वापर करावा लागणार आहे. याचा अर्थ ग्राहकांनी चेकशी संबंधित माहिती दिल्यानंतरच चेक क्लिअर होईल. नियमातील हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी असेल. PNB दंड आकारणार- पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank) जे नियम बदलणार आहे, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणुकीची प्रक्रिया फेल झाली तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्कम 100 रुपये होती. मात्र आता ती वाढवून 250 रुपये करण्यात आली आहे. LPG घरगुती गॅसची किंमत- एलपीजीचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केले जातात. यावेळी म्हणजेच 1 फेब्रुवारीला एलपीजी घरगुती गॅसचे दर वाढतात की स्थिर राहतात, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    First published:

    Tags: Gas, LPG Price

    पुढील बातम्या