Home /News /money /

LIC IPO: एलआयसीच्या पॉलिसीधारकांना या आयपीओमध्ये किती मिळणार फायदा? आधी पूर्ण करा हे काम

LIC IPO: एलआयसीच्या पॉलिसीधारकांना या आयपीओमध्ये किती मिळणार फायदा? आधी पूर्ण करा हे काम

LIC IPO: LIC च्या बहुप्रतिक्षित आयपीओसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यातही पॉलिसीधारक असलेले किरकोळ गुंतवणूकदार हे या आयपीओमध्ये अधिक रुची दाखवत आहेत.

मुंबई, 29 जानेवारी: शेअर बाजारात (stock market latest update) येणारा कोणत्याही कंपनीचा आयपीओ (Upcoming IPO List) गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी असते. त्यातच एलआयसीचा (LIC IPO) मेगा आयपीओ मार्च शेवटापर्यंत येऊ शकतो, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. या बहुप्रतिक्षित आयपीओसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यातही पॉलिसीधारक असलेले किरकोळ गुंतवणूकदार हे या आयपीओमध्ये अधिक रुची दाखवत आहेत. याचं मोठं कारण म्हणजे त्यांना आयपीओसाठी मिळणारा वेगळा कोटा. सरकारने पॉलिसीधारकांसाठी आयपीओमध्ये 10 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. म्हणजेच एलआयसी पॉलिसीधारकांना आयपीओमध्ये 10 टक्के वेगळा कोटा मिळेल. याचाच अर्थ त्यांना शेअर्स मिळण्याची अधिक शक्यता असेल. मात्र आता त्यांना या वेगळ्या कोटाचा लाभ कसा मिळणार ? हा प्रश्न आहे. डिमॅट खाते असलेले बरेच एलआयसी पॉलिसीधारक हा प्रश्न विचारत आहेत की, आम्हाला शेअर्स मिळवण्यासाठी काय करावं लागेल? आज आम्ही तुम्हाला त्याबाबत माहिती देणार आहोत. हे वाचा-SBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार पॅन कार्ड लिंक असणं गरजेचं जर पॉलिसीधारकांना आयपीओसाठी अर्ज करायचा असेल, तर एलआयसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांना प्रथम एलआयसीच्या साइटवर त्यांचा पॅन अपडेट करावा लागेल. एलआयसीने त्यांच्या पब्लिक नोटीसमध्ये म्हटलं आहे की, 'आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी, पॉलिसीधारकांना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा पॅन बरोबर असल्याची खात्री करावी लागेल.' तसेच, भारतातील कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणं अनिवार्य आहे. असं करा पॅन कार्ड लिंक -सर्व प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा. - येथे तुम्हाला ऑनलाइन पॅन नोंदणीचा ऑप्शन मिळेल. तो निवडा - ऑनलाइन पॅन नोंदणीचे पेज उघडताच, proceed या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी पेजवरील proceed या ऑप्शनवर क्लिक करा. - तुमचा ईमेल, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक याची माहिती भरा. - बॉक्समध्ये captcha कोड टाका. - तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्याची विनंती करा. - तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होताच, तो सबमिट करा. - सबमिट केल्यानंतर यशस्वी नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. हे वाचा-Budget 2022 आधी 'या' 10 शेअर्समध्ये गुंतवणुकीची ब्रोकरेज फर्मची शिफारस तुमचा पॅन एलआयसीच्या रेकॉर्डमध्ये अपडेट झाला आहे की नाही, हेदेखील तुम्ही पुढील स्टेप्सने तपासू शकता. - https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या लिंकवर जा. - पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन तपशील आणि captcha कोड टाका. नंतर सबमिट वर क्लिक करा - पॅन अपडेटबाबत माहिती तुम्हाला दिसेल. देशातील आयपीओ मार्केट सध्या तेजीत आहे. एकामागून एक, अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणत आहेत. लवकरच एलआयसीचा आयपीओ लाँच होत आहे. ही एक गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगलीच संधी असणार आहे?
First published:

Tags: Finance, Insurance, Investment, LIC, Money, Savings and investments, Stock Markets

पुढील बातम्या