Home /News /money /

दुप्पट होणार PM Kisan चा फायदा? 2000 ऐवजी मिळणार 4000, काय आहे मोदी सरकाची योजना?

दुप्पट होणार PM Kisan चा फायदा? 2000 ऐवजी मिळणार 4000, काय आहे मोदी सरकाची योजना?

PM kisan: पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो.

    नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: पीएम शेतकरी सन्मान निधीअंतर्गत (PM kisan Samman Nidhi) लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांना मिळणारी 2000 रुपयांची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे तीन हप्ते या योजनेअंतर्गत मिळतात, आता हा हप्ता 4000 रुपये होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांनुसार लवकरच शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम डबल करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रुपयांऐवजी 12000 रुपयांची रक्कम मिळू शकते. मीडिया अहवालांच्या मते, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Niramala Sitharaman) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधीचे पैसे दुप्पट करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. दरम्यान अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हे वाचा-Post Office ची खास स्कीम, पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा; काय आहे योजना शेतकऱ्यांना मिळतो 6000 रुपयांचा फायदा पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. हे वाचा-CarTrade IPO: तुम्हाला मिळाले का कारट्रेडचे शेअर्स? तपासा सोप्या पद्धतीने पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606/011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM Kisan

    पुढील बातम्या